मुंबई : नवमातांना आई बनल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बाळाच्या जन्मानंतर स्तनपान देताना महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. यावेळी महिलांच्या स्तनांचा आकारंही वाढतो. याचप्रमाणे अनेक बदल महिलांच्या स्तनांमध्ये होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदा बाळाला दूध पाजताना या दूधातून बाळाला प्रोटीन मिळतं. हे Colostrum असून यामध्ये आजाराशी सामना करणारे अँटीबॉडीज असतात. यामुळे बाळाची इम्म्युनिटी वाढते आणि पचनास मदत होते. पहिल्या तीन दिवसात येणारं दूध अतिशय पौष्टिक असतं. कारण त्याकाळात prolactin हार्मोन अॅक्टिव्ह होतात. 


बाळाला दूध पाजताना ब्रेस्टमध्ये कोणते बदल होतात


बाळाला दूध पाजताना ब्रेस्टला काही प्रमाणात मुंग्या येणं, टोचल्यासारखं जाणवणं तसंच आणि थोडी जळजळ होणं असे बदल दिसून येतात. मुख्य म्हणजे हे बदल सामान्य आहेत. काही कालवधीनंतर हे जाणवत देखील नाही. 


बाळाला नियमित दूध पाजल्याने ब्रेस्टमध्ये दुखणं, दूध जास्त झाल्याने सूज येणं असे त्रासही होत नाहीत. 


अशीच एक समस्या म्हणजे स्तनपान करताना स्तनांना खाज येणं. काहीवेळा महिलांना बाळाला स्तनपान देताना निप्पल्सला खाज येण्याची तक्रार, त्यामुळे बाळाला दूध पाजण्यासही त्रास होतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये हे सामान्य असू शकतं. परंतु जर दीर्घकाळ हा त्रास होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये.