मुंबई : प्रत्येक महिन्यात मासिक पाळी येते आणि मासिक पाळी येण्यापूर्वी ती PMS ची लक्षणं देखील घेऊन येते. PMS म्हणजे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम आहे. ही एक अशी स्थिती आहे जी, महिलांच्या मासिक पाळीला सामोरं जाण्यापूर्वी तिच्या मनःस्थितीत बदल घडवून आणते. हे सर्व आपल्या शरीरातील काही हार्मोनल बदलामुळे घडतं. काही महिलांसाठी PMS लक्षणं इतकी गंभीर असतात की, त्यामुळे नियमित कामकाजात व्यत्यय येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांना पिरीयड्स येण्यापूर्वी हार्मोन्समध्ये असंतुलन होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम हा शारीरिक आणि भावनिक लक्षणांचा एक संग्रह मानला जातो. ज्यावेळी शरीरात हार्मोन्सच्या स्तरामध्ये होते तेव्हा या अनुभव जाणवू लागतो. मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि दरम्यान पीएमएस स्त्रियांच्या मोठ्या प्रमाणात महिलांना प्रभावित करतं.


PMS ची लक्षणं


  • पोट फुगणं

  • क्रॅम्स येणं

  • स्तनांमध्ये वेदना किंवा सूज

  • पाठदुखी

  • नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी झोपणं

  • डोकेदुखी


पीरियड्सपूर्वी PMSची लक्षणं का दिसतात?


पीएमएसची लक्षणं मासिक पाळीच्या जवळपास 5 दिवस अगोदर दिसून येतात. शरीरातील एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्समध्ये घट झाल्यानंतर PMS ची लक्षणं दिसून येतात. तर दुसरीकडे या हार्मोन्सचा शरीरात स्तर वाढल्यानंतर नही लक्षणं दिसून येत नाहीत. 


जर PMSसारखी ही लक्षणं दररोजच्या जीवनात परिणाम करत असतील, किंवा मासिक पाळीच्या दिवसांव्यतिरीक्त लक्षणं दिसून आली तर डॉक्टरांना दाखवून घ्या.