मुंबई : सध्या इंटरनेटचा वापर वाढला असून इंटरनेटमुळे युट्युबचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर वाढलाय. आतापर्यंत कोट्यावधींच्या घरात Youtube Channel बनले आहेत. शिक्षण, मनोरंजन, पैश्यांची गुंतवणूक असे लाखो व्हिडिओज Youtube वर पाहिले जातात. यात महिला-तरुणी देखील आघाडीवर असून त्या सर्वात जास्त वापर करताना दिसतात. अशातच एक रिपोर्ट्स समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीप्रमाणे, भारतात एकूण 15 कोटी इंटरनेट यूजर्स पैकी 6 कोटी महिला आहेत. यातील सुमारे 75 टक्के महिला 15 ते 34 वयोगटातील आहेत. मात्र महिला किंवा तरुणी Youtube वर नेमकं काय सर्च करतात हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.


शॉर्ट व्हिडिओज् 


युट्युबवर तरुणींना शॉर्ट व्हिडिओ पाहायला आवडतात. आता Youtube ने देखील Shorts हे नवे फीचर्स सुरू केलंय. Youtube Shorts व्यतिरीक्त मुली इंस्टाग्राम आणि टिकटॉक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शोधतात.


डेस्टिनेशन वेडिंग 


युट्युबवर बहुतेक तरुणी Destination Wedding बद्दल सर्च करतात. याशिवाय मुली प्रीवेडिंग फोटो आणि Video देखील शोधतात. 


फॅशन ट्रेंड 


आपण सुंदर दिसावं, उठून दिसावं असा प्रत्येक तरूणी विचार करते. यासाठी बहुतांश तरुणी Youtube ची मदत घेतात. मेकअप, फॅशन, ट्रेंड्स, ब्यूटी ट्रीटमेंट्स तसंच घरगुती उपचार याबाबत युट्युबवर सर्वाधिक सर्च केलं जातं. 


म्युझिक व्हिडीयोज


युट्युबच्या सर्च रिपोर्ट्सनुसार, म्युझिक हे कायम टॉप ट्रेंडमध्ये असतं. विशेषत तरुणींना युट्युबवर गाण्यांचे व्हिडीयोज पाहायला आवडताच. तरुणीच नाही तर तरुणांनाही म्युझिकचं वेड आहे.