मुंबई : आज कालची तरूण पिढी त्यांचा अर्धा वेळ इंटरनेटवर घालवते. कोणतीही माहिती हवी असेल तर आपण सर्वप्रथम इंटरनेटवर सर्च करतो. यामध्ये मुलीही एखादी प्रेमाची कविता वाचण्यासाठी किंवा आपल्या जोडीदाराला पाठवण्यासाठी इंटरनेटचा वापरतात. याशिवाय मुली इंटरनेटवर लठ्ठपणा किंवा नोकरीशी संबंधित माहिती शोधतात. चला तर मग जाणून घेऊया मुली इंटरनेटवर आणखी काय शोधतात.


2 कोटी महिला असतात ऑनलाईन एक्टिव्ह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील एकूण 150 मिलियन युझरपैकी, भारतातील सुमारे 20 मिलियन महिला इंटरनेट वापरतात. यामध्ये 75 टक्के महिला 15-34 वयोगटातील आहेत. 


अहवालानुसार, 31 टक्के किशोरवयीन मुली इंटरनेटवर डायटिंग आणि तंदुरुस्त राहण्याचे सर्व मार्ग शोधतात. याशिवाय 17 टक्के लोक सेक्स, डिप्रेशन ड्रग्ज इत्यादींबद्दल सर्वाधिक सर्च करतात. 


दिवस-रात्र महिला इंटरनेटवर सर्च करतात


लहानपणापासूनच आपल्या करिअरबाबत महत्त्वाकांक्षी असलेल्या मुली इंटरनेटवर यासंबंधीची माहिती शोधतात. जसं की, त्यांनी कोणत्या दिशेने करिअर करावं किंवा कोणता कोर्स करावा.


याशिवाय अनेक महिला आपल्या सौंदर्यासाठी नवनवीन टिप्स सर्च करतात, त्या स्वत:ला सुंदर ठेवण्यासाठी इंटरनेटवर सर्व प्रकारचं संशोधन वाचत असतात.


काही महिला लठ्ठपणाने त्रस्त असतात. अशा महिला अधिकतर आपलं वजन कमी करण्याबाबत सर्च करतात. जेणेकरून त्या सहजतेने त्यांचं वनज कमी करू शकतात.


केसांसंदर्भात देखील महिला चिंतेत असतात. अशावेळी त्या स्वतःच केस कापण्याबाबत सर्च करतात. ज्यामुळे ते स्वतःच्या हिशोबाने केस कापू शकतील.