योनीमार्गाला स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत आणि सोपी पद्धत
योनीमार्गाची स्वच्छता कशी ठेवायची असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात असतात.
मुंबई : शरीर साफ ठेवण्यासाठी आपण पूर्ण काळजी घेतो. पण योनीमार्गाच्या स्वच्छतेचं काय? शरीर साफ ठेवण्यासाठी आपण साबणाचा वापर करतो. मात्र योनीमार्गाची स्वच्छता कशी ठेवायची असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात असतात. जर तुम्ही योनी स्वच्छ ठेवण्यासाठी केमिकलयुक्त साबणाचा वापर करत असाल तर योनीचा पीएच स्तर बदलू शकतो. यामुळे दुर्गंधी तसंच इन्फेक्शन होण्याचा धोकाही अधिक असतो.
योनीमार्गाला कसं स्वच्छ ठेवावं? दरम्यान इन्स्टाग्रावर डॉ तनाया नरेंद्र यांनी एक रील शेअर करून योनीमार्गाची स्वच्छता कशी राखावी आणि त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती दिली आहे.
डॉ तनाया यांच्या सांगण्यानुसार, मुळात योनीमार्ग धुण्याची गरज नसते. कारण महिलांच्या शरीरातील योनी हा एक असा अवयव आहे जो स्वतःची स्वच्छता ठेवू शकतो. मात्र एक छोटीशी चूकही महागात पडू शकते.
ज्यावेळी तुम्ही शॉवर घेत असाल तेव्हा हल्क्या पद्धतीने साबणाचा वापर करा. इंटिमेट वॉशचा यावेळी तुम्ही वापर करू शकता. यामध्ये कोणत्याही रसायनाचा वापर नसेल याची मात्र काळजी घ्याल, असंही डॉ. तनाया यांनी सांगितलंय.
जाणून घ्या योनीमार्गाला स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत
योनीमार्गाला साफ ठेवण्यासाठी केवळ गरम पाण्याचा वापर करा
योनी साफ करताना योनीच्या आतील भागात कोणत्याही गोष्टीचा वापर करू नये
योनीमार्गाच्या आता पाणीही जाणार नाही याची काळजी घ्या
योनी साफ करताना तुम्ही आजूबाजूचा भाग साफ करताना बोटांचा वापर करू शकता.
क्लिटोरल हुडला नीट साफ करा