मुंबई : स्तनांमधील प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असते असं नाही. स्तनांमध्ये गाठ होण्याची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते आणि त्याची लक्षणं देखील प्रत्येक महिलेनुसार वेगवेगळी दिसू शकतात. स्तनाच्या गाठींचा आकार, त्यामध्ये दिसणारी लक्षणं ही त्याच्या कारणावर अवलंबून असतात. हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि इतर कारणांमुळे स्तनांमध्ये आढळणारी गाठीची समस्या सामान्य मानली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्तनांमध्ये गाठ दिसत असल्यावर ही लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांकडे नक्कीच सल्ला घ्या


स्तनातील प्रत्येक भागातील टिश्यू कडक होणं


  • काखेत गाठ किंवा सूज येणं

  • स्तनांवरील त्वचा बदलणं

  • स्तनांमध्ये तीव्र वेदना होणं

  • निप्पलमधून रक्तस्राव होणं

  • स्तनांच्या आकारात बदल होणं


स्तनांमध्ये गाठ होण्याची कारणं


मेस्टायटिस


मेस्टायटिसमध्ये स्तनांमधील टिश्यूंना सुज येते. महिलेने स्तनपान दिल्यानंतर ही समस्या उद्भवू शकते. स्तनपानाव्यतिरिक्त, मेस्टायटिस इतर अनेक कारणांमुळे देखील होऊ शकतो.


इंट्राडक्टल पेपिलोमा


या स्थितीत, निप्पलजवळ छोट्या गाठी तयार होऊ लागतात. साधारणपणे 30 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. यामध्ये निप्पलमधून रक्तस्त्रावही होऊ शकतो.