Changes In Breast After Sex : सेक्स (Sex) हा प्रत्येक जोडप्यासाठी एक आनंद देणारा आणि नातं मजबूत करणारा क्षण असतो. मात्र तुम्हाला माहितीये का, सेक्सदरम्यान तुमच्या शरीरामध्ये (Changes In Body After Sex) अनेक बदल होतात. खासकरून महिलांच्या शरीरामध्ये आरोग्याच्या दृष्टीने हे बदल घडतात. महिलांच्या शरीरात शारीरिक संबंधांदरम्यान रक्तप्रहावामध्ये बदल घडून येतात. यासोबतच महिलांच्या स्तनांमध्ये देखील बदल होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सेक्सनंतर महिलांच्या स्तनांमध्ये बदल होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे याबाबत महिलांनी मनात अजिबात भीती आणू नये. 


जाणून घेऊया सेक्सनंतर महिलांच्या स्तनांमध्ये कोणते बदल होतात?


स्तन अधिक संवेदनशील होतात


शेक्स दरम्यान महिलांच्या शरीरात उत्साह वाढतो, ज्यामुळे मोठे बदल होतात. महिलांचे स्तन एरोजेनस झोन असतात, म्हणजेच त्यांना स्पर्श झाला की, ते अतीसंवेदनशील होतात. केवळ निप्पल नव्हे तर संपूर्ण एरोलाचा भाग संवेदनशील होतो. 


स्तनांचा आकार वाढतो


सेक्सदरम्यान शरीर हे चार टप्प्यांना पार करतं. यामध्ये उत्तेजना, पठार, भावनोत्कटता आणि संकल्प यांचा समावेश आहे. यावेळी शरीराला सूज येण्याची शक्यता असते. यावेळी महिलांच्या योनीच्या आकारातमध्ये बदल होतो. याचसोबत स्तनांच्या आकारामध्ये वाढ होऊ शकते. 


एरोला भागाला सूज येणं


शारीरिक संबंधांनंतर स्तनांच्या आकारांप्रमाणे महिलांच्या एरोलाचा आकारात देखील वाढ होते. हे रक्ताने भरलेलं स्तनांचं संयोजन आहे, ज्यामुळे आकारात बदल होतो. 


स्तनांना घाम येणं


सेक्सनंतर हा एक मोठा बदल महिलांच्या शरीरात होतो तो म्हणजे, स्तनांना घाम येऊन त्याला वेगळा गंध येतो. विज्ञानानुसार, याला फेरोमोन (Pheromones) म्हटलं जातं. एरोलामध्ये एपोक्राइन ग्रंथी असतात ज्या फेरोमोन्स सोडतात. मुख्य म्हणजे, याचा गंध महिलांपेक्षा पार्टनरला अधिक येतो.