मुंबई : जीन्स, टी-शर्ट, शर्ट आणि पँट्स वापरण ही काही मुलांचीच मक्तेदारी राहीली नाहीए.  आजकाल मुलीही जीन्स, टी-शर्ट, शर्ट आणि पँट्स नियमित वापरतात. मुलामुलींच्या या कपड्यांमध्ये बारीकसा फरक असतो. जो आपल्या पटकन लक्षात येत नाही किंवा येतोही. त्यातलाच एक म्हणजे मुलींच्या शर्टला खिसे नसतात. अस का असतं ?


उत्सुकता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खिसे असलेले मुलांचे शर्ट आपण पाहतो पण मुलींचे खिसे असलेले शर्ट आपण पाहिले नसेल. कारण मुलींच्या शर्टला खिसे नसतातच.


यामागची कारणे आपण शोधली तर अनेक तर्क वितर्क आपल्याला ऐकायला मिळतात. यामागे कोणते विज्ञान लपले नसले तरी अनेकांना या प्रश्नाची उत्सुकता असते. 


पुरुषी मानसिकता 


यामागे काही काळापूर्वी पुरुषप्रधान संस्कृतीचा बघण्याचा दृष्टीकोन असल्याचा अंदाज आहे. हे कारण आपली परंपरा आणि आपल्या मानसिकतेशी जोडले गेले आहे. 


सौंदर्य कमी ?


पुर्वीच्या काळी महिलांच्या कपड्यांमध्ये खिसा बनवला जात नसे. जर महिलांच्या कपड्यांना खिसा असेल तर त्या आपल्या खिशात नक्कीच काही ना काही ठेवतील.


त्यामुळे त्यांच्या शरीराची ठेवण बदललेली दिसेल आणि सुंदरता कमी होईल अशी मानसिकता होती.


याच कारणामुळे महिलांच्या कपड्यांना खिसे नसायचे. 


स्टाईल बदलतेय 


या सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की आजच्या काळातही बहुतांश महिलांकडे केवळ सौंदर्याची गोष्ट म्हणूनच पाहिले जाते.


कपडे परिधानाचा विषय असेल तर महिलांचे स्टाईल स्टेटमेंट बदलत आहे.


पुर्वीच्या काळात महिलांनी खिसा ठेवण्याची इच्छा ठेवली पण त्यांना त्यावेळी विरोध झाला.