मुंबई : अनेक महिलांना व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच अंगावरून पांढरं जाण्याची समस्या असते. काही महिला पिरीयड्सपूर्वी मोठ्या प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होण्याची तक्रार करतात. दरम्यान यापूर्वी अनेक कारणं असू शकतात. यामध्ये यीस्ट इंफेक्शन, अस्वच्छता यामुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. असं होत असल्यास महिलांनी याकडे दुर्लक्ष न करता उपचार करून घ्यावेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्‍हाइट डिस्चार्ज होण्याची कारणं


बॅक्टेरियल इन्फेक्शन


अनेकदा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे पिरीयड्सपूर्वी व्हाईट डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी महिलांना स्वच्छता बाळगणं फार गरजेचं आहे. गरज भासल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.


व्हिटॅमिन कमतरता


व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही ही तक्रार महिलांमध्ये उद्भवू शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुमच्या आहारात फायबरचा समावेश करावा. ज्यामध्ये तुम्ही ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करू शकता.


यीस्‍ट इन्फेक्‍शन


यीस्‍ट इन्फेक्‍शनची लक्षणं दिसू लागल्यावर पिरीयड्पूर्वी व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो. यावेळी तातडीने डॉक्टरांशी बोलून उपचार घ्यावेत


ताणतणाव


अनेक महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्जचं कारण हे ताणतणाव देखील असू शकतं. ताणतणाव दूर करण्यासाठी तुम्ही ब्रीदींग एक्सरसाईज, योगा आणि मेडिटेशनची मदत घेऊ शकता.


सततचे गर्भपात


एखाद्या महिलेचे सातत्याने गर्भपात होत असतील तर व्हाईट डिस्चार्जची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक उपायांचा वापर केला पाहिजे.