मुंबई : या गुबगुबीत बाळाचं नाव आहे ल्युईस. मेक्सिकोमध्ये राहणारा ल्युईस फक्त १० महिन्यांचा आहे. मात्र त्याचं वजन इतर मुलांच्या तुलनेत खूप अधिक आहे. सध्या त्याचं वजन २८ किलोंहूनही अधिक आहे. त्याच्या वजनामुळे ल्युईसच्या आई वडिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार महिन्यांचा असल्यापासूनच त्याची प्रकृती इतर मुलांच्या तुलनेत जास्तच सुदृढ असल्याचे त्याच्या आईने सांगितले. आपलं बाळ सुदृढ असल्याचं तिला कौतुक वाटत होतं. मात्र कालांतराने  ल्युईसचं वाढतं वजन तिच्या चिंतेत भर टाकू लागलं. इतकंच नाही तर डॉक्टरही ल्युईसचं वजन पाहून चक्रावून गेले. कारण १० महिलांच्या मुलाचं २८ किलो वजन हे त्यांच्यासाठी देखील नवीन होतं. परंतु, त्याचं वजन नेमकं कशामुळे वाढलं हे स्पष्ट झालेले नाहीत. यावरून डॉक्टरांमध्ये देखील मतभेद आहेत. 


पण त्याच्या या वाढत्या वजनामुळे त्याला देखील खूप त्रास होत आहे. त्याला शरीराची हालचाल करता येत नाही, बसण्याचा प्रयत्न करताच तोल जाऊन तो पडतो, असे त्याची आई इसाबेल हिने सांगितले. ल्युईसला उपचारासाठी आठवड्यातून चारवेळा हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते. त्याच्या वडिलांचे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्याच्या उपचारांचा खर्च कुटुंबियांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे या दाम्पत्याने फेसबुक पेज तयार करून ल्युईसच्या उपचारांसाठी मदत करण्याचं आवाहन ते करत आहेत.