Accident News : स्पेनच्या (Spain) एका नाईट क्लबमध्ये (Night Club) आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे लागलेल्या या भीषण आगीत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी (Spain Police) दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आगीचे कारण शोधण्याचे काम अग्निशमन विभागाने सुरु केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेनमधील मर्सिया शहरातील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आग आटोक्यात आणली आणि क्लबमध्ये शोधाशोध सुरू केली. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 


फोंडा मिलाग्रोस या नावाने ओळखल्या जाणार्‍या टीटर नाईट क्लबमध्ये ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की त्यांना स्थानिक वेळेनुसार सकाळी 6:00 वाजता दोन माळ्याच्या नाईटक्लबला आग लागल्याची माहिती मिळाली होती. तिथे पोहोचल्यावर आधीच 4 मृतदेह सापडले होते. 40 मिनिटांनी आणखी 2 मृतदेह सापडले. त्यानंतर एक तासाभरानंतर मृतांची संख्या सात झाल्याची माहिती बचाव पथकाने दिली.


सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी बरेच जण एका ग्रुपमधील आहेत जे क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करत होते. मृतांचे मृतदेह गंभीररित्या जळाले असून त्यांची ओळखही पटू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.


दरम्यान, स्पेनच्या पोलिसांनी सांगितले की, एका कुटुंबातील पाच सदस्य आणि दोन मित्र बेपत्ता आहेत. नाईट क्लबमध्ये कोसळलेल्या छतामुळे पीडितांना शोधणे कठीण होत आहे. तसेच आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच त्यावेळी अग्निशमन यंत्रणा का काम करत नव्हती? याचाही शोध घेतला जात आहे.