हैद्राबाद : आस्ट्रेलियाचा हा मुलगा जगातील सर्वात लहान उद्योजक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमिश फिनलेसन असं या मुलाचं नाव असून तो फक्त १३ वर्षांचा आहे. अलिकडेच हैद्राबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेसाठी जगभरातून आलेल्या उद्योजकात हा मुलगा आकर्षणाचा विषय ठरला. 


पाच अॅप्लिकेशन केले विकसित


सातवीत शिकणाऱ्या हेमिशने आतापर्यंत पाच अॅप्लिकेशन विकसित केले आहेत. तसंच कासवांना वाचवण्यासाठी एक अॅपही तयार केलं आहे. ही अॅप्लिकेशन्स पर्यावरणावर आधारीत आहेत. त्यानंतर आता तो आरोग्यविषयक अॅप तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 


या विषयात रस वाढला


आठ वर्षांचा असल्यापासून तो अॅप तयार करत आहे. काही वर्षांपूर्वी अॅप तयार करण्याच्या एका स्पर्धेत हेमिशने  सहभाग घेतला होता. या स्पर्धेनंतर या विषयात त्याचा रस अधिकाधिक वाढत गेला. लहानग्या हेमिशनं तयार केलेले अॅप अॅपल आणि गुगल प्ले स्टोअरमध्येही उपलब्ध आहे. 


 हेमिश म्हणतो...


हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेसाठी उपस्थिती लावण्याची संधी मला मिळाली, येथे लहान उद्योजक म्हणून माझं कौतुक होत आहे याचा मला आनंद आहे. मी सर्वात लहान उद्योजक म्हणून नावारूपाला येत आहे. ही चांगली गोष्ट आहे पण याचबरोबर मी माझ्या अभ्यासावरही माझं लक्ष केंद्रित करतो, असंही तो म्हणाला.