मुंबईः एका 18 वर्षांच्या मुलीने ऑनलाइन व्यवसाय करून अवघ्या 2 वर्षात सुमारे 4 कोटी कमावले आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की तिने असा कोणता व्यवसाय केला असेल ज्यातून तिने इतक्या कमी वेळात इतके पैसे कमावले असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हिया पोरकोकोने 2 वर्षांपूर्वी 2020 मध्ये eBay स्टोअर सुरू केलं होतं.  ज्याद्वारे तिने एवढी मोठी कमाई केली आहे. ऑलिव्हिया ड्रॉपशिपिंग मॉडेलद्वारे कार्य करते.


ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहणारी ऑलिव्हिया यापूर्वी मॅकडोनाल्डमध्ये काम करत होती. ऑलिव्हियाच्या म्हणण्यानुसार, तिला तिथे काम करणे आवडत नव्हते. त्यामुळे तिने ऑनलाइन व्यवसायासाठी जुगाड केला. इंटरनेटवर सर्च केल्यानंतर तिला ड्रॉपशिपिंगची माहिती मिळाली.



यामध्ये, उत्पादन थेट उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचवले जाते. लॉकडाऊन दरम्यान, यूट्यूबवर व्हिडिओ पाहून तिला याबद्दल माहिती मिळाली. 


ऑलिव्हियाचा व्यवसाय एक वर्षानंतर चांगला सुरू झाला. एका महिन्यात या व्यवसायातून तिनं 40 लाख रुपये कमावले. ऑलिव्हियाने या प्लॅटफॉर्मद्वारे अनेक श्रेणींच्या उत्पादनांची विक्री केली आहे.


या यशस्वी व्यवसायामुळे आज ती आलिशान जीवन जगत आहे. ऑलिव्हियाला दुसरा व्यवसाय सुरू करायचा असून ती सध्या मार्केटिंगचा अभ्यास करण्याचा विचार करत आहे.