इतकं मोठं..! 18 व्या शतकातील अवाढव्य बाथटब पाहून विश्वासच बसणार नाही
18th century Cold Bath Photos : विविध शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सल्ला दिला जात होता. दररोज शक्य नसलं तरीही ...
18th century Cold Bath Photos : पुरातत्तंव विभागाच्या हाती लागणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला भारावणाऱ्या असतात. अनेक शतकं मागे जाऊन त्या काळातील आयुष्य नेमकं कसं होतं याचीच प्रचिती या उत्खननामुळं येते. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच समोर आलेले काही फोटो पाहा. हे फोटो व्यवस्थित पाहा, तुम्हाला त्यातून काही अंदाज येतोय का?
Wessex Archaeology या पुरातत्व उत्खनन संस्थेशी संलग्न असणाऱ्या काही मंडळींनी 18 व्या शतकातील एका सार्वजनिक न्हाणीघराचं उत्खनन केलं. जिथं त्यांना अतिशय दुर्मिळ अशा Cold Bath पाहायला मिळालं.
एका राष्ट्रीय संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत हे उत्खनन हाती घेण्यात आलं होतं. ज्यामुळं 18 आणि 19 व्या शतकातील न्हाणीघरांचं चित्र जगासमोर आणणं शक्य झालं. Wessex Archaeology च्या माहितीनुसार त्या काळात करमणुकीची केंद्र असणाऱ्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमस्थळी किंवा देशातील काही पुढारलेल्या शहरांमध्ये हे 'कोल्ड बाथ' पाहायला मिळत होते.
'बीबीसी'नं जाणकारांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 18 व्या शतकामध्ये वैद्यकिय क्षेत्रातील अभ्यासार्थींकडूनही अनेकांन महिला आणि पुरुषांना कोल्ड बाथ अर्थात थंडगार पाण्यानं अंघोळ करण्याचा सल्ला दिल्याचं कळतं. विविध शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सल्ला दिला जात होता. दररोज शक्य नसलं तरीही जास्तीत जास्त वेळा काही मिनिटांसाठी का असेना पण, थंडगार पाण्यानं अंघोळ करत क्षणात पुन्हा गरम पाण्यानं अंघोळ करण्याचा सल्ला दिला जायचा.
हेसुद्धा वाचा : 'तारे ज़मीन पर' फेम बालकलाकार इतका मोठा झाला? आमिरचं नाव घेताच म्हणतो, 'अशक्यच..'
उपलब्ध माहितीनुसार 1769 आणि 1771 दरम्यान Bath Assembly Rooms तयार करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या सार्वजनिक न्हाणीघरांवर बॉम्ब हल्ले करण्यात आले आणि यामध्ये त्यांचं मोठं नुकसान झालं. युद्धानंतर बऱ्याच वर्षांनी या न्हाणीघरांमध्ये भर घालत जमीन तयार करण्यात आली तर, काही न्हाणीघरांचा वापर गोदाम म्हणून केला जात होता.
अवघं काही मिनिटं थंडगार पाण्यानं अंघोळ करण्याचे फायदे-
- शरीरावरील सूज कमी करणं
- सांधेदुखी कमी करणं
- व्यायामातून झालेल्या दुखापतींपासून आराम
- शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवणं
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं
- मानसिक आरोग्य संतुलित राखणं