बिजिंग : चीनमधील बिजिंगच्या दक्षिणी दाशिंग जिल्ह्यात भीषण आग लागली. या आगीत १९ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.


दक्षिणी दाशिंग जिल्ह्यात आग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाशिंग जिल्ह्यातील शिन्जिआन गावात एका घरात आग लागली. शनिवारी स्थानिय वेळेनुसार सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.


३ तासांनी आगीवर नियंत्रण 


आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. चीनमधील सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआच्या वृत्तानुसार, रात्री जवळपास ९ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.


१९ नागरिकांचा होरपळून मृत्यू 


या आगीत १९ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर आठजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.


एक संशयित पोलिसांच्या ताब्यात


जखमी नागरिकांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीनंतर चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेच पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतलं आहे.