नवी  दिल्ली : जगभरात कोरोनाचा विळखा वाढताना दिसतोय. यूकेमध्येही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. यूकेमधील रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 3 एप्रिलपर्यंत मृतांच्या संख्येत 20 टक्क्यांची वाढ झाली असून हा आकडा आता 4313वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूकेमध्ये 4 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 1,83,190 लोकांची कोरोना चाचणी झाली. त्यापैकी 41,903 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून या लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.


यूकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3939 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच ते 104 वयोगटातील लोकांचा समावेश आहे. 


अमेरिकेत एका दिवसांत १४८० जणांचा मृत्यू, एका दिवसांतील सर्वाधिक मृत्यू


 


कोरोना व्हायरसमुळे इराणमधील मृतांची संख्या 3452वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत 158 नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.


तर नेदरलँड्समधील कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 164ने वाढून 1651 पर्यंत गेली असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून शनिवारी देण्यात आलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6 टक्क्यांनी वाढून 16,627 वर गेली आहे.


अमेरिकानंतर, इटली स्पेनमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 19 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 14,681 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


संपूर्ण जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोच आहे. जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाखांहून अधिकवर गेलाय. तर जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 59 हजारांवर पोहचली आहे.