मुंबई : शंभरहून अधिक देशांत कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत 5 हजारहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी अनेक अफवा उठत आहेत. कोरोनोच्या लागणने नाही तर चक्क अफवांनी इरानमधील 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरानमध्ये वाऱ्यासारखी कोरोनाची लागण पसरत आहे. आतापर्यंत पाच हजारहून अधिक लोकांना लागण झाली आहे. ही लागण थांबवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शाळा, कॉलेज, सांस्कृतिक आणि खेळ यासारखे सर्व मोठे उत्सव थांबवण्यात आलं आहे. 



चीनमधून पसरलेल्या या खतरनाक वायरसने जगभरात आतापर्यंत एक लाखहून अधिक लोकांना लागण झाली आहे. आतापर्यंत 3 हजारहून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या व्हायरसने घाबरून ईरानमध्ये अल्कोहोल पिऊन बचाव करण्यासाठी गेलेल्या 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


इरानची न्यूज एजन्सी IRNA ने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हायरसच्या संक्रमणपासून वाचण्यासाठी अनेक उपाय समोर येत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवत काही लोकांनी मिथेनॉल प्यायलाची घटना समोर आली. यामध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. 



जुंदिशापुर मेडिकल युनिर्व्हसिटीच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार 218 लोकांना रूग्णालयात दाखल केलं आहे. अधिक प्रमाणात मिथेनॉल प्यायल्यामुळे डोळ्यातील दृष्टी, किडनी खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो.