मुंबई : चीन या देशाने आपलं जगभरातील सर्वच देशांतील बाजारपेठ आपल्या वस्तूंनी व्यापली आहे. मोबाईल. टीव्ही, संगणक अशा नेहमीच्या वापरातल्या वस्तूंची विक्री करत वापरकरत्यांनाही 'मेड इन चायना' ची सवय लावली आहे. कमी पैशांत हवी तशी वस्तू अशी बाजारात ओळख बनवली आहे. थोडक्यात काय तर तंत्रज्ञानामध्ये चीनने गेल्या काही वर्षात खूप मोठी भरारी घेतलीयं. प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेला चीन आता आकाशात जाऊन थेट चंद्राला आव्हान देऊ पाहतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या दोन वर्षांमध्ये म्हणजेच 2020 पर्यंत आकाशात तीन कृत्रिम चंद्र सोडण्याचा चीनचा मानस आहे. असं पाऊल उचलणारा चीन हा काही पहिलाचं देश नाही. याआधी रशियानेदेखील असा प्रयत्न केला पण तो चांगलाच फसला होता.


कोणाला फायदा ?


चीनमधील चेंगडू शहरमध्ये रात्रीच्या दिव्यांवर दरवर्षी 24 कोटी इतका खर्च येतो. यावर पर्याय म्हणून हा चंद्र काम करणार आहे.


त्यामुळे चीनी सरकारचे वर्षाचे 24 कोटी यामुळे वाचणार आहेत. चेंगडूमधील 10 ते 80 कि.मीचा परिसर हा चंद्र व्यापणार आहे. त्यामुळे या शहरात या कृत्रिम चंद्राचा प्रकाश पाहायला मिळेल. 


चीनच्या‘चेंगडू एरोस्पेस सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सिस्टम रिसर्च इंस्टिट्यूट कॉर्पोरेशन’ने या कामासाठी पुढाकार घेतलाय.


जवळचा चंद्र 


आपल्याला सध्या आकाशात दिसणारा चंद्र हा पृथ्वीपासून 3 लाख 84 कि.मी वर आहे पण हा चीनी चंद्र केवळ 500 कि.मी इतक्या जवळ असणार आहे.


त्यामुळे चेंगडूच्या नागरिकांसाठी हा चीनी चंद्र जवळचा वाटू शकतो.


प्राण्यांवर परिणाम 


चीन हा पराक्रम करतंय पण याचे दुष्परीणामही आहेत असंही म्हटलं जातंय. रात्री जर कृत्रिम प्रकाश जमिनिवर पडला तर प्राण्यांवर त्याचा विपरित परिणाम होईल असं म्हटलं जातंय.