अमेरिकत भीषण अपघातात तीन भारतीय महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या तिन्ही महिला गुजराती आहेत. त्यांची ओळख पटली असून रेखाबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मनिषाबेन पटेल अशी त्यांची नावं आहे. अपघात इतका भीषण होता की, कार सर्व लेन ओलांडून दुभाजकावर चढली. तसंच झाडांवर आदळण्यापूर्वी किमान 20 फूट उंच हवेत उडाली. दक्षिण कॅरोलिनाच्या ग्रीनविले काउंटी येथे हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रीनविले काउंटी कॉरोनर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, एसयुव्हीने सर्व लेन पार करत दुभाजकावर चढली होती. पुलाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या झाडांवर वाहन आदळण्यापूर्वी ते 20 फूट उंच हवेत उडालं होतं. 


"त्यांनी वेगमर्यादा ओलांडली होती हे स्पष्ट दिसत आहे," असं चीफ डेप्युटी कोरोनर माईक एलिस यांनी डब्ल्यूएसपीए या वृत्तवाहिनीला सांगितलं. तसंच या अपघातात इतर कोणत्याही कारचा सहभाग नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ही कार एका झाडावर अडकलेली होती. तिला अक्षरश: चुराडा झाले असून अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेली आढळली. यावरुन ती किती वेगात होती याचा पुरावा मिळत आहे. 


अपघाताचं वर्णन करताना माईक एलिस यांनी सांगितलं की, "तुम्हाला क्वचितच एखादं वाहन दिसतं जे रस्त्यावरून इतक्या वेगाने निघून जाते की ते रहदारीच्या 4 ते 6 लेन ओलांडतं आणि 20 फूट उंच झाडावर जाऊन अडकतं". सध्या तरी हे वाहन रस्त्यावर दिसत आहे. पण जेव्हा वाहनाने चारही लेन ओलांडत्या तेव्हा ते 20 फूट उंच हवेत उडालं असावं असंही त्यांनी सांगितलं. 


अपघाताची माहिती मिळताच साउथ कॅरोलिना हायवे पेट्रोल, गॅन्ट फायर अँड रेस्क्यू आणि अनेक ग्रीनविले काउंटी ईएमएस युनिट्ससह आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघातात एकजण बचावला असून, तो जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान मृत महिलांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे.