VIRAL VIDEO : सोशल मीडिया अनेक व्हायरल व्हिडीओंचा खजिना आहे. फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यावर हवे तेवढे वेगवेगळे व्हिडीओ दिवसाला पडतं असतात. काही व्हिडीओ हे खूप कॉमेडी असतात, तर काही खूप भावनिक, काही व्हिडीओ तर खूपच आश्चर्यचकीत करणारे असतात. काही व्हिडीओ इतके छान असतात ते पाहूनच दिवसभराचा सगळा थकवाच नाहीसा होतो. असाच एक मेजशीर आणि आश्चर्यकारक व्हिडीओ वाऱ्या सारखा पसरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही कधी चालती फिरती बिल्डिंग बघितली आहे का? हो, चालती फिरती अख्खी भली मोठी इमारत. सोशल मीडियावर या इमारतीचा व्हिडीओ तुफान गाजतोय. इमारतीचा हा अद्भूत व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की दंग व्हाल.


ऐकावं ते नवलच



एखाद घर जुनं झालं की आपण ते पाडून दुसरं बांधतो  किंवा जर आपल्याला वर्षांनुवर्ष राहत असलेलं घर अचानक सोडवं लागलं तर, आपण नवीन ठिकाणी नवीन घरात जातो. परंतु सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चक्क इमारतच शिफ्ट केली जात आहे. एखाद सामान शिफ्ट करावं तशी ही इमारत शिफ्ट केली जातेय. हा व्हिडीओ एका महिला अधिकारीने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.


 


चालती फिरती इमारत



जवळपास 100 वर्ष जुनी ही 5 मजली इमारत या व्हिडीओत चालताना दिसत आहे. या इमारतीचं वजन 38 लाख किलोग्राम येवढं आहे. येवढी जुनी आणि जड इमारती एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर घेऊन जाणं किती कठीण असेल, याची कल्पनाही आपण करु शकतं नाही. ही चीनमधील शंघाई शहरातील शाळा आहे आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली जात आहे. या व्हिडीओला पाहिल्यावर तज्ञ्जांचं अद्भूत कामाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे असं तुम्हाला वाटेल.



खरंच,.. हा व्हिडीओ पाहिल्यावर तर असं वाटू लागलं आहे की, आजच्या जगात आता काही कठिण नाही,  तुम्हाला अर्जुन कपूर आणि नीना गुप्ताचा Sardar Ka Grandson हा चित्रपट आठवतो का? या चित्रपटातही आजीच्या इच्छेसाठी नातू अर्जुन कपूर लाहौरमधील पिढीजात घर अमेरिकेत शिफ्ट करतो. हे देखील तसंच काही आहे, असं आपण म्हणू शकतो.