3 Days Week off : 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; `या` कंपन्यांमध्ये नवा नियम लागू, तुमचा नंबर कधी?
4 Days Working Week: आठवड्याच्या सुट्टीसाठीच प्रत्येक कर्मचारी काम करत असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. समजा तुम्हाला एका आठवड्यामध्ये 3 दिवसांची सुट्टी मिळाली तर?
4 Days Working Week: (Job News) नोकरीला जाणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या संस्थेकडून काही अपेक्षा असतात. अशीच एक अपेक्षा असते ती म्हणजे सुट्ट्यांची (Holidays). सुट्टी... मग ती (Week Off) आठवडी असो किंवा एकदाच घेतलेलील मोठीच्या मोठी सुट्टी असो. कामाच्या आणि दैनंदिन जीवनातील व्यापाचा ताण कमी करणारी ही सुट्टी प्रत्येकालाच प्रिय असते. तुम्हाला आठवड्यातून किती दिवस सुट्टी असते?
दोन किंवा एक दिवस असंच तुमचं उत्तर असेल. बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्टी असं सोपं गणित लागू असतं. काही कंपन्यांमध्ये हेच गणित 6 दिवस काम आणि 1 दिवस सुट्टी अशा पद्धतीनं लागू असतं. पण, आता तेसुद्धा बदललं असून, 4 दिवस काम आणि तब्बल 3 दिवस सुट्टी हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. भारतातलही श्रम कायदा अर्थात (Labour Code) लेबर कोडमध्ये 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी या गणितानुसार काही बदल केले गेले आहेत. पण, हा कायदा मात्र अद्यापही लागू करण्यात आलेला नाही.
ब्रिटनमधील अनेक कंपन्यांनी लागू केला हा नवा नियम (Britain Companies)
जिथं संपूर्ण जगात अनेक मोठ्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्याना नोकरीवरून काढलं जात आहे, तिथंच ब्रिटनमधील काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आठवड्याचून तीन दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय घेण्याची तयारी केली जात आहे. आठवड्यातून फक् 4 दिवसच काम करण्याच्या आधारे झालेल्या एका निरीक्षणामध्ये हे सूत्र यशस्वी ठरल्याचे निष्कर्ष जगासमोर आणले. या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांनी 4/3 चा हा नियम आपण पुढंही सुरुच ठेवू असंही स्पष्ट केलं आहे.
हेसुद्धा वाचा : Job In Danger | जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीची नोकरी जाणार? पगारवाढही धोक्यात? पाहा स्पेशल रिपोर्ट
ऑक्सफर्ड (Oxferd), केम्ब्रिज (Cambridge) यांसारख्या विद्यापीठांतून सर्व्हेक्षणात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या प्राध्यापक ज्युलियट स्कोर यांच्या म्हणण्यानुसार, 'विविध कंपन्यांमध्ये हे परिणाम अनेक अंशी एकसारखे आणि स्थिर आहेत. हा एक नवा प्रयोग असून, तो अनेक संस्थांसाठी काम करताना दिसतो.' चार दिवसच काम करावं लागत असल्यामुळं कर्मचाऱ्यांनी चांगली Productivity दाखवत कंपनीला फायदा होईल अशाच आशयानं उत्तम कामं केली, शिवाय त्यांच्या सुट्ट्यांचं प्रमाणंही कमी झालं. सध्याच्या घडीला यशस्वी ठरलेली ही प्रायोगिक योजना येत्या काळात इतरही कंपन्यांकडून राबवण्याची तयारी दाखवली जाऊ शकते.
भारतात हा नियम लागू होणार?
भारतात केंद्राकडून नवा लेबर कोड लागू करण्यात आला आहे. पण हा नियम मात्र लागू नाही. देशात हा नियम लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस 12 तासांप्रमाणे 48 तास काम करावं लागणार आहे. असं केल्यास त्यांना तीन दिवसांची सुट्टी मिळेल. काही कंपन्या या तयारीतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
WHO नं मांडला महत्त्वाचा मुद्दा, कर्मचाऱ्यांचं आयुष्य...
WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीचा उल्लेख करताना एडम ग्रांट (ऑर्गेनायजेशनल साइकोलॉजिस्ट एंड ऑथर) यांनीही काही गोष्टी स्पष्ट केल्या. या दिवसांमध्ये अनेकजण Over Working म्हणजेच प्रमाणाहून जास्त कामाचा शिकार होत आहेत. अनेकजण यामध्ये जीवाला मुकत आहेत. द्यामुळं सध्या एक मोठा वर्ग मानसिक आरोग्याशी झुंजताना दिसत आहे. येत्या काळात ही परिस्थिती 'क्रॉनिक डिसीज'चं कारणही ठरताना दिसेल. ज्यामध्ये 4 दिवस काम आणि तीन दिवसांची सुट्टी हे गणित कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक (Mental health) आरोग्यासाठीही लाभदायक ठरेल असं स्पष्ट होत आहे. कोरोना काळानंतर कामाच्या पद्धतींमध्ये आलेली सहजता आणि यामुळं खासगी- व्यावसायिक आयुष्यावर होणारे परिणाम हे मुद्देही इथं महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात.
कोणत्या कंपन्यांमध्ये 4-Day Work Week लागू?
उपलब्ध माहितीनुसार जगभरात सध्या 271 कंपन्यांनी 4-Day Work Week लागू केला आहे. यापैकी काही खालीलप्रमाणे...
कॅनडा - शोपिफाई (Seasonal)- आठवड्यात 32 तास काम
कॅनडा - ईकोट्रस्ट (Permanent)- आठवड्यात 32 टक्के काम
जपान- तोशिबा (Trail Base) - आठवड्यात 40 टक्के काम
जपान - मायक्रोसॉफ्ट (Permanent)- आठवड्यात 32 टक्के काम
अमेरिका - बुफेर (Permanent)- आठवड्यात 32 टक्के काम