6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास; इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
एका तरुणीने अनोखा विश्व विक्रम रचला आहे. या तरुणीने इलेक्ट्रिक कारने 6 खंड, 27 देशांची सफर केली आहे.
Lexie Limitless : सपूर्ण जग फिरायचं आहे... असं स्वप्न अनेक लोक पाहतात. मात्र, अमेरिकेच्या लेक्सी अल्फोर्ड (Lexie Alford) नावाच्या तरुणीने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करुन दाखवले आहे. लेक्सीने 6 खंड, 27 देश फिरत तब्बल किमीचा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे लेक्सीने जगाची ही सफर इलेक्ट्रिक कारने केली आहे. लेक्सीच्या या अनोख्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
Lexie Limitless या नावाने लेक्सीचे सोशल मिडियावर अकाऊंट आहे. लेक्सी तिचे ट्रॅव्हल व्हॉग सोशल मिडियावर शेअर करत असते. लेक्सीने इलेक्ट्रिक कारने संपूर्ण जगाचा प्रवास केला आहे. लेक्सीने इलेक्ट्रिक कारने 6 खंड, 27 देश आणि 30,000 किलोमीटरचा प्रवास करून जागतिक विक्रम रचला आहे. इलेक्ट्रिक वाहनातून जगभर प्रवास करणारी लेक्सी ही जगातील पहिला महिला ठरली आहे. 2019 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी लेक्सीने 195 देशांना भेटी दिल्या आहेत. हा देखील लेक्सीचा एक जागितिक विक्रम ठरला आहे.
ऑल-इलेक्ट्रिक फोर्ड एक्सप्लोरर इलेक्ट्रिक कारने लेक्सीची जगभ्रमंती
ऑल-इलेक्ट्रिक फोर्ड एक्सप्लोरर इलेक्ट्रिक कारने लेक्सीची जगभ्रमंती सुरु आहे. फोर्डने खास युरोपियन ग्राहकांसाठी ही कार डिझाइन केली आहे. आफ्रिकेत असलेला विजेचा तुटवडा, चिलीच्या अटाकामा वाळवंटात चार्जिंगच्या सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या कच्चा रस्ते, डोंगरदऱ्या आणि कड्याक्याची थंडी अशा अनेक संकटांचा सामना करत लेक्सीने या इलेक्ट्रिक कारने प्रवास केला आहे.
टेस्टिंगसाठी दिली कार
लेक्सीने तिच्या वर्ल्ड टूरसाठी वापरलेली फोर्ड एक्सप्लोरर इलेक्ट्रिक कार हे प्री-प्रॉडक्शन मॉडेल आहे. कंपनीने तिला टेस्टिंगसाठी ही कार दिली होती. अगदी खडतर रस्त्यावरु ही कार प्रवाल करु शकते असा दावा कंपनीने केला होता. या सर्व परिस्थितींचा विचार करुनच्या कंपनीने या कारची निर्मीती केली आहे. प्रवासादरम्यान, कार चार्ज करण्यासाठी AC वॉल चार्जर तसेत 2.2 kw क्षमतेचे DC फास्ट चार्जर वापरण्यात आले. 26 मिनीटांमध्ये ही कार 10 ते 80 टक्के चार्ज होते. 5.3 सेकंदात ही करा 100 किमी इतका स्पीड पकडते.