रोम :  सर्वचं देशांमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशात इटलीमध्ये एका 23 वर्षीय महिलेला फायझर बायोएनटेक कोरोना लसीचे 6 डोस एकाचं वेळी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेवर लसीचा कोणत्याही प्रकारचा विपरित परिणाम होवू नये म्हणून तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला घरी पाठवण्यात आलं आहे. इटलीच्या टस्कनी येथील नोआ रूग्णालयात महिलेला 6 फायझर लसीचे डोस देण्यात आले आहेत.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रूग्णालयाच्या प्रवक्त्यांनी संबंधित माहिती दिली आहे. ते म्हणाले 24 तास महिलेले रूग्णालयात  देखरेखीखाली ठेवण्यात आलं. त्यानंतर महिलेला सोमवारी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एका आरोग्य कर्मचाऱ्याने संपुर्ण कुपीतील लस महिलेला दिली. त्यानंतर काही क्षणातचं आरोग्य कर्मचाऱ्याला त्याच्या चूकीची जाणीव झाली. आता त्या 23 वर्षीय महिलेची  प्रकृती स्थिर आहे. 


23 वर्षीय महिलेला लस देणारी आरोग्य कर्मचारी मानसशास्त्र विभागात इंटर्न आहे. या प्रकरणी अंतर्गत चौकशी करण्यात आली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. ही घटना चुकून झाली असून कोणालाही इजा पोहोचवण्याचा रूग्णालयाचा हेतू नव्हता असं देखील रूग्णालयाने सांगितलं आहे.