नवी दिल्ली : रविवारी इथोपियन एयरलाइंसच्या विमान अपघातात 6 भारतीयांसह 157 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये पर्यावरण मंत्रालयाचे सल्लागार यांचा देखील समावेश आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. या अपघातात वैद्य पन्नागेश भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश, नुकावारपू मनीषा आणि शिखा गर्ग या भारतीयांचा मृत्यू झाला. इथियोपियामधील उच्चायुक्तांना भारतीय मृतकांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी इथोपियाची राजधानी अदीस अबाबा येथून या विमानाने उड्डाण केलं होतं. पण काही वेळेतच ते जमिनीवर येऊन आदळलं. इथोपियन एअरलाइंसने या घटनेची माहिती दिली. इथोपियन एअरलाइंसचं बोइंग 737-8 एमएएक्स हे विमान कशामुळे दुर्घटनाग्रस्त झालं याची माहिती अजून समोर आलेली नाही. 157 मृत नागरिकांमध्ये 35 देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. बोइंग विमान स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8.38 वाजता उडालं होतं आणि 6 मिनिटातच त्याचा संपर्क तुटला. विमान दुर्घटनेमागचं कारण समोर आलं नसलं तरी पायलटने इमर्जंसी कॉल दिला होता. विमानाला परत येण्यासाठी परवानगी दिली होती. पण त्याआधीच ते जमिनीवर जाऊन कोसळलं.



परराष्ट्र मंत्र्यांनी इथोपियामधील भारतीय राजदुतांचा हेल्पलाइन नंबर शेअर केला आहे.