6 वर्षांच्या मुलाचं Daily Timetable चर्चेत! अभ्यासासाठीचा राखीव Time पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का
Viral Child Daily Calender: लहान मुलांच्या बुद्धीला दाद द्यावी तेवढीच कमी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकतर त्यांना कधी काय सूचेल याचा काही नेम नाही त्यातून तेही मोठ्या माणसांच्याच चांगल्या वाईट सवयींचेही अनुकरण करताना दिसतात. तेव्हा सध्या अशाच एक पोस्टनं इंटरनेटवर कल्ला केला आहे.
Viral Child Daily Calender: लहान मुलांच्या हुशारीच आपण कायमच कौतुक करत असतो त्यातून ते कधी काय करतील याची काहीच जाणीव नसते. अनेकदा लहान मुलांच्या आन्सरशीट्स किंवा त्यांच्या वहीतील काही नोट्स तूफान व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या या व्हायरल पोस्टची अनेकदा चर्चा होताना दिसते. आता अशाच एका लहान मुलाच्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी इंटरनेटवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आपण सगळेच जणं आपल्या रूटिनबद्दल सतत बोलताना दिसतो. त्यातून आपल्यालाही असं वाटतं राहतं की, आपण आपल्या डेली कामांचे काहीतरी व्यवस्थित योग्य प्रकारे नियोजन कारावे अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे चला तर पाहुया की, अशाच एका लहान मुलानं आपलं कशाप्रकारे आपलं डेली टाईमटेबल बनवलं आहे.
शाळेतही आपल्यालाही सांगितले जाते की, तुम्ही तुमची रोजनिशी बनवा म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. तुम्हीही तुमची कामं वेळेवर करू शकाल आणि मोठेपणीही तुम्हाला त्याचा फायदा होईल. ही सवय लहानपणापासूनच मुलांवर रूजावी म्हणून शाळेतील शिक्षक आणि सोबतच पालकही आग्रही असतात. परंतु अनेक मुलं ही अशीही असतात जी स्वत:हूनच आपल्याला अशा सवयी या लावून घेतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगते. आता अशाच एका मुलानं आपल्या बुद्धीनं आपलं डेली कॅलेंडर बनवलं आहे. हे पाहून तुम्हालाही त्याच्या बुद्धीला सलाम केल्यासारखा वाटेल. त्यानं त्या डायरीत लिहिलेले सर्वच मुद्दे वाचून तुम्हालाही घाम फूटेल. तुम्ही पाहिलंत का?
हेही वाचा - ''उर्फीनं सगळ्यांना बिघडवून ठेवलंय'', 'दृश्यम 2' फेम अभिनेत्रीच्या sexy ड्रेसनं भल्याभल्यांना केलं हैराण
@Laiiiibaaaa या युझरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं आपलं डेली टाईमटेबल शेअर केलं आहे. ज्यात त्यानं आपल्या टर्मवरती आपली दिवसाची सगळी काम लिहिली आहेत. त्यानं प्रत्येक वेळेला कोणती कामं करायची आहेत याबद्दल लिहिलं आहे आणि कोणत्या कोणत्या वेळेला काय काय करायचे आहे हेही लिहून ठेवलं आहे. त्यानं यात अभ्यासासाठी केवळ 15 मिनिटे राखून ठेवली आहेत. तर एक तास खेळायला आणि आज्जी आजोबांसह किती वेळ घालवायचा यावरही वेळ काढला आहे.
या पोस्टखाली नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आत्तापर्यंत या फोटोला 1.2 मिलियन युझरनं पाहिलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे. हा फोटो सगळीकडेच व्हायरल झाला आहे. अशावेळी नानातऱ्हेच्या कमेंट्सही व्हायरल झाल्या आहेत.