Shriya Saran Bold Dress: श्रिया सरन ही दाक्षिणात्त्य आणि हिंदी सिनेमातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मागच्या वर्षी तिचा 'दृश्यम 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. या चित्रपटाला सगळीकडूनच चांगली प्रतिक्रिया मिळाली होती. त्यातून अभिनेत्री श्रिया सरणच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक करण्यात आले होते. तीही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्टाग्रामवरही तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. नुकतीच ती एका अवोर्ड फॅंगशनला पोहचली होती. त्यावेळी ती स्पॉट झाली परंतु तिनं यावेळी घातलेल्या ड्रेसनं ती चांगलीच ट्रोल झाली आहे. तिच्या सेक्सी ड्रेसमुळे तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.
तिचा ड्रेस यावेळी खूप रिव्हिलींग होता आणि अक्षरक्ष: तिच्या कंबरेकडील भाग ओपन होता. त्यामुळे तिला यावेळी प्रचंड वाईट भाषेत ट्रोल करण्यात आलं आहे. काही युझरनं चक्क तिला म्हटलंय की, मॅडम तुम्ही एंडरवेअर घालायला विसरलात? त्यामुळे ती प्रचंड प्रमाणात ट्रोल झाली आहे. अनेकांनी तिची तुलना ही उर्फी जावेदशी केली होती. उर्फीनं सगळ्यांनाच बिघडवून ठेवलं आहे असं अनेक ट्रोलर्सनी म्हटलं आहे. तर काहींनी म्हटलंय की, काय आता सगळेच उर्फीकडून कपडे विकत घेत आहेत का? अनेकांनी तिला 'उर्फी पार्ट 2' असंही म्हटलं आहे. तेव्हा यावेळीही तिच्या ड्रेसमुळे उर्फी जावेदची आठवण नेटकऱ्यांना आल्याशिवाय राहिली नाही. त्यामुळे सध्या सगळीकडेच तिचीच चर्चा आहे. याआधीही ती अशाच एका बोल्ड ड्रेसमुळे ती चर्चेत आली होती.
हेही वाचा - सिनेमाला गेलेल्या हेमांगीला एकदम काय झालं? म्हणाली, ''दुख, दर्द, पीडा!''
श्रिया सरन ही अनेकदा आपल्या सोज्वळ आणि सुंदर असा पारंपारिक साडीत किंवा ड्रेसमध्ये आपले फोटो शेअर करत असते आणि अनेकदा ती तिच्या अशाच आऊटफिटसाठी ओळखली जाते. परंतु तिचा असा हा लुक पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे तिला ट्रोल करण्याची एकही संधी नेटकऱ्यांनी सोडलेली नाही. तिला नेटकऱ्यांनी सपाटून ट्रोल केले आहे.
यावेळी तिनं डीप कट-आऊट वेस्टचा आणि नी-हाय स्लिटचा ड्रेस परिधान केला होता. हा एक डेनिमप्रमाणे होता. तिनं ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्यावर तिनं डायमंड ज्वेलरी घातली होती. आणि हेअरस्टाईल पोनीप्रमाणे केली होती. या ड्रेसचीही किंमत फार जास्त होती. त्यातून यावेळी तिनं हिल्स घातले होते.