मॉस्को : युएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार बुधवारी रशिया जवळच्या Kuril Islands येथे बुधवारी ७.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला आणि पुरत्या रशियामध्ये याचे पडसाद दिसले. जपानच्या साप्पोरो येथून उत्तर पूर्वेला जवळपास 1400 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान या भूकंपामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूकंप झाल्यानंतर या भागात त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता. पण, नंतर हा इशाला मागे घेण्यात आला. The Pacific Tsunami Warning Centre च्या माहितीनुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 1000 किमी अंतरापर्यंत त्सुनामीच्या लाटा उसळण्याची शक्यता होती. असं असलं तरीही, यापूर्वी झालेल्या काही भूकंपांमध्ये या तीव्रतेच्या भूकंपातही त्सुनामी आली होती. त्यामुळेच हा सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. 


रशियातील या भूकंपामुळे अधिक आक्रमक लाटा निर्माण झाल्या नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. या भूकंपानंतर The Pacific Tsunami Warning Centreकडून जपान, रशिया, हवाई, पॅसिफीक आयलंड, नॉर्थर्न मॅरिआना आणि वेक आयलंड येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जो काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं लक्षात येताच मागेही घेण्यात आला.


 


दरम्यान, जपानच्या हवाई खात्याकडून मात्र असा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. समुद्राच्या लाटांमध्ये हलकासा बदल झालेला जाणवेल इतकाच इशारा त्यांच्याकडून देण्यात आला.