अमेरिकेचा अल-शबाबवर हवाई हल्ला !
मोगादिशू : अमेरिकी सैन्याने सोमालियातील दहशतवाद्यांचे dविशेष सुरक्षा दल असलेल्या तीन ठिकाणी हवाई हल्ला केला. ज्यात अल-शबाबचे सात आतंकवादी ठार झाले. न्यूज एजेन्सी सिन्हुआनुसार, सोमालियामध्ये सुरक्षा रक्षकांनी जिलिबमध्ये संयुक्त अभियान सुरु केले.
अल-शबाब यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही :
अफ्रीकॉमने सांगितले की, "आम्ही अभियानाच्या परिणामांचा अभ्यास करणे सुरु ठेऊ आणि अधिक माहिती मिळवत राहू." परंतू, अल-शबाबने अमेरिकी हवाई हल्ल्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.