एका केकवरून तब्बल 7 वर्ष चालली कोर्टात लढाई!
एका केकसाठी झालेलं सात वर्षांचं भांडणं तेही कोर्टात सुटलं यावर तुमचा विश्वास बसेल.
लंडन : केकच्या तुकड्यावरून भावा-बहिणींमध्ये किंवा मित्र मैत्रिणींमध्ये झालेली गमतीशीर भांडणं तुम्ही पाहिली असतील. मात्र एका केकसाठी झालेलं सात वर्षांचं भांडणं तेही कोर्टात सुटलं यावर तुमचा विश्वास बसेल. मात्र लंडनमध्ये अशी घटना घडली आहे. एका केकवरून कोर्टात झालेल्या लढाईत सात वर्षांनंतर त्या व्यक्तीला हार मानावी लागली आहे.
समलैंगिक अधिकारांसाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याने बेकरीवर भेदभाव केल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली होती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे की, बेकरीने केकवर 'समलिंगी विवाहाला समर्थन' असं लिहिण्यास नकार दिला. त्यामुळे हा पूर्णपणे भेदभाव आहे.
गे राईट एक्टिविस्ट गॅरथ ली यांना यूरोपीय मानवाधिकार न्यायालयाने झटका दिला आहे. कोर्टाने, या व्यक्तीने सर्व पर्यायांचा वापर केला नसल्याचं सांगत त्याची केस फेटाळून लावली.
2014 मध्ये ख्रिश्चन चालवल्या जाणाऱ्या बेलफास्ट बेकरीने 'समलिंगी विवाहाला समर्थन द्या' या वाक्यासह केक देण्यास नकार दिल्यानंतर गॅरेथने कायदेशीर कारवाई सुरू केली. हे वाक्य ख्रिश्चन मान्यतांचं उल्लंघन करतं, असं बेकरीचं म्हणणं होतं.
गॅरेथ ली यांनी बेकरीवर लैंगिक आणि राजकीय आधारित भेदभावाचा आरोप केला. स्थानिक कोर्टाने बेकरीला भेदभावासाठी दोषी ठरवून त्यांच्या बाजूने निर्णय दिला. परंतु 2018 मध्ये यूके सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक न्यायालयांच्या भूमिकेशी असहमती दाखवून बेकरीच्या बाजूने निर्णय दिला.
यानंतर गॅरथ यांनी European Court of Human Rights मध्ये धाव घेतली. याठिकाणी 7 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर त्यांच्या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्याला कोणताही आधार नसल्याचं खंडपीठात असलेल्या बहुतेक न्यायाधीशांचं मत होते. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली.