मुंबई : एकावेळी गर्भवती स्त्रीने दोन, तीन किंवा चार मुलांचा जन्म दिल्याचं आपण ऐकलं आहे. पण एका 25 वर्षांच्या महिलेनं एकावेळी 9 मुलांना जन्म दिला आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण ही सत्य घटना आहे. मोरोक्को मधील एक महिलेने मंगळवारी एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला आहे. तर त्या महिलेची आणि तिच्या नवजात बालकांची प्रकृती अगदी उत्तम असल्याचं देखील सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे माली सरकारने 25 वर्षांच्या हलिमा सीजेला 30 मार्चला चांगली देखभाल करण्यासाठी मोरोक्कोला पाठविले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोरोक्कोमधील अ‍ॅन बोर्जा क्लिनिकमध्ये हलिमाने मुलांना जन्म दिला आहे. त्याचे संचालक प्रोफेसर यूसुफ आलोई यांच्या म्हणण्यानूसार, 'ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे. 10 डॉक्टर आणि 25 नर्स यांनी मिळून 9 मुलांची डिलिव्हरी केली आहे. मुलाचं वजन 500 ते 1 किलोग्रामपर्यंत आहे.या मुलांना दोन ते तीन महिने इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाईल.'


या प्रकारच्या गर्भधारणेमागील कारण काय आहे?
पाहायला गेलं तर ही गर्भधारणा नैसर्गिक नसते. काही फर्टिलटी उपचारामुळे अशी गर्भधारणा होते. पण हलिमा सिसेयांच्या गर्भधारणेमागील कारण  अद्याप समोर आलेलं नाही.  केनियामधील केन्याटा नॅशनल रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ बिल कालुमी यांचा असा विश्वास आहे, की फर्टिलटी उपचारामुळे अशी गर्भधारणा होते. 


भीतीदायक म्हणजे अशा प्राकारच्या गर्भधारणेमध्ये बालकांसह मातेच्या जीवाला देखील मोठा धोका असतो. अशा देशांमध्ये र्भपात कायदेशीर मान्यता प्राप्त आहे. अशा घटनेत 37 आठवड्यांपूर्वी मुलं जन्माला येतं. अशा बालकांमध्ये रोगप्रतीकार शक्ती फार कमी असते. त्यांची वाढ योग्य प्राकारे होत नाही.