Teddy Bear on Mars: आपल्याला आकाशात वेगवेगळ्या आकृत्या या दिसत असतात. कधी त्या ढगांमध्ये दडलेल्या असतील तर कधी तुम्ही ते आकाशातल्या ताऱ्यांमध्ये पाहिले असतील. सध्या अशीच एक आकृती वैज्ञानिकांना सापडली आहे. त्यात तुम्ही पाहून शकता की एका प्राण्याचा हसरा चेहरा (Faces in space) या फोटोमध्ये दिसते. हा प्राणी तुमच्या आमच्या घरातलाच आहे. तसा घरातला नव्हे, पण तुम्ही लहानपणी ज्या टेडी बेअरसोबत खेळला आहात. तोच हा प्राणी आहे. वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावरती एक आकृती सापडली आहे. ज्यात एका अस्वलाचा चेहरा दिसतो आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या फोटोकडेच लागले आहे. या फोटोला तुम्हाला प्रथमदर्शी एक अस्वलाचा चेहरा दिसेल. ( a bear face on mars goes viral on social media see the full photo)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अंतराळ वैज्ञानिकांचे लक्ष आणि मोठमोठ्या संस्था या मंगळावरील संशोधनाकडे आणि तेथील जीवनाकडे लागले आहे. त्यातूनही अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येत आहेत. त्यातच त्यांना हा एक फोटो सापडला आहे. अंतराळातून हा हसणाऱ्या अस्वलाच्या चेहऱ्यासारखा दिसतो आहे. हा फोटो मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटरनं मंगळावरून सुमारे 251 किमीवरून परिभ्रमण करत काढले आहे. 


नासाच्या (NASA) मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर (Mars Reconnaissance Orbiter) वरील कॅमेऱ्यानं काढलेल्या आणि 25 जानेवारी रोजी ऍरिझोना विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या या फोटोमध्ये दोन गोल डोळे आणि तोंड असलेला एक विशाल अस्वलाचा चेहरा दिसतो आहे. खरतंर भौगोलिक दृष्टीकोनातून पाहायला गेलं तर ही एक खडक निर्मिती आहे. डोळे म्हणजे ग्रहावरील दोन मोठे विवर आहेत तर डोक्याचा गोलाकार नुमना हा मोठ्या खड्डयांमुळे झाला आहे. 


युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाचा हाय-रिझोल्यूशन इमेजिंग सायन्स एक्सपेरिमेंट (HiRISE) नं त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की,  V-आकाराची रचना (नाक), दोन खड्डे (डोळे), आणि वर्तुळाकार फ्रॅक्चर पॅटर्न (डोके) असलेली टेकडी. हा तोंड आणि नाकाकडील भाग मोठ्या ज्वालामुखीमुळे तयार झालेला असावा. याआधीही मंगळ ग्रहावर अनेक शोध लागले आहेत. NASA च्या Mars Reconnaissance Orbiter ला सापडला. आग्नेय हेलास प्लानिटिया प्रदेशातील मंगळाच्या वाळूच्या ढिगाऱ्यावर ऑर्बिटरने विचित्र शेवरॉन चिन्हांचा संच देखील शोधला होता. 



सध्या मंगळ ग्रहावरही जीवसृ्ष्टी येऊ शकते याकडेही संशोधन सुरू आहे त्यामुळे अशाप्रकारे अनेक गोष्टी आपल्याला मिळू शकतात. सध्या असे अनेक शोध लागत आहेत आणि सगळ्यांचेच लक्ष त्याकडे वेधले आहे. असे अनेक फोटोज आपल्या समोर येण्याची शक्यता आहे.