सोशल मीडिया म्हटलं की त्यावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हीदेखील भावूक व्हाल. कारण यामध्ये तहानलेला चिंपांझी पाणी पिण्यासाठी चक्क माणसाची मदत घेत आहे. इतकंच नाही तर पाणी पिऊन झाल्यावर तो त्याचे हातही स्वच्छ करुन देतो. हा व्हिडीओ अनेकांना भावूक करत असून, लोकांना भूतदयेची शिकवण देत आहे. आनंद महिंद्रा यांनाही या व्हिडीओने भुरळ घातली असून, त्यांनी ट्विटरला शेअर केला आहे. 


व्हिडीओत नेमकं काय ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीत चिंपांझी फोटोग्राफरला हात धरुन खाली बसवताना दिसत आहे. यानंतर चिंपांझी त्याच्या हाताची ओंझळ करतो आणि पाणी पितो. इतकंच नाही तर पाणी पिऊन झाल्यावर चिंपांझी त्याचे हातही धुवून देतो. यावेळी फोटोग्राफरही आश्चर्याने चिंपांझीकडे पाहत बसलेला असतो. 


हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, 1.8 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तसंच 26 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. युजर्स मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर करत असून, त्यावर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. 


आनंद महिंद्राही झाले प्रभावित


आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिली आहे की, "ही व्हिडीओ क्लिप गेल्या आठवड्यात जगभरात व्हायरल झाली. आफ्रिकेच्या कॅमरुन येथे एका चिंपांझीला फोटोग्राफरने पाणी पिण्यास मदत केली. नंतर हात धुत त्याने आभार मानले. एक गरजेची शिकवण - तर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या समाज आणि कामाच्या ठिकाणच्या लोकांची मदत आणि समर्थन करा. या बदल्यात तुम्हालाही समर्थन मिळेल".



सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस


हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, "प्राणी आणि माणसांमध्ये अशा प्रकारे बोलणं होणं हे मनाला स्पर्श करणारं आहे. अशी लक्षणं सर्व जिवंत प्राण्यांना एकमेकांप्रती जोडण्यास मदत करतात. या बदल्यात ते कोणतीही अपेक्षा न करता सहायता आणि दया दाखवतात".


एका दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, सर्व प्राणी, पक्ष्यांसाठी निसर्ग वाचवणं गरजेचं आहे हे माणसाला समजलं पाहिजे. पर्यावरणाचं नुकसान हे सर्वांसाठीच धोकादायक आहे.