ब्रिटन : सफारी पार्क फिरायला जाण्याची उत्सुकता काही वेगळीच असते. अनेक जण आपल्या गाड्या घेऊन प्राणीसंग्रहालयात फिरण्यासाठी निघतात. एखादा प्राणी दिसला की त्याला जवळून पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही आणि त्यांना आणखी जवळून पाहण्याच्या नादात काही लोकं धोका पत्करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिराफला जवळून पाहण्याचा नादात एक जोडपं गाडीची काच खाली करुन गाडी त्याच्या जवळ घेतात. पण जेव्हा जिराफ गाडीच्या खिडकीतून मान आता टाकतो तेव्हा काय होतं हे या व्हिडिओमध्ये पाहा.