Google Ex-Employer LinkedIn Post: गेल्या अनेक दिवसांपासून जगात मोठं संकट सुरू आहे आणि ते म्हणजे नोकरकपातीचे. सध्या सगळीकडेच या नोकरकपातीमुळे ((Global Layoff) सगळ्याचे कर्मचाऱ्यांच्या टोक्यावर टांगती तलवार आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, अॅमेझॉनसारख्या (Google) बड्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना कंपनीतून काढून टाकले आहे त्यांनी आता लिंकडिनवरून आपापल्या भावना मांडायला सुरूवात केली आहे. सध्या या पोस्टनं पुन्हा एकदा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नक्की या कर्मचाऱ्यानं आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. तेव्हा जाणून घेऊया की नक्की तुम्ही कोणकोणत्या गोष्टी आता गुगलमध्ये काम करताना लक्षात ठेवाल कारण सध्या ही व्हायरल होणारी पोस्ट कर्मचाऱ्यांच्या आणि लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. (a google former emoployer linkedin post goes viral trending news marathi)


कोण आहे का कर्मचारी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत. आत्तापर्यंत गुगलनं 12000 कर्मचारी कपात केली आहे. त्याचसोबत कुठल्याही भावनिक पोस्ट लिहिण्यापेक्षा या कर्मचाऱ्यानं डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट शेअर केली आहे. या कर्मचाऱ्याचे नाव आहे जोएल लेईच (Joel Leitch). याची लिंकडीन पोस्ट सध्या सगळीकडेच व्हायरल होते आहे. जोएलनं गेली 16 वर्षे गुगलमध्ये काम केले आहे. या पोस्टमधून त्यानं कंपनीबद्दल एकही वाईट शब्द काढला नाही परंतु त्यानं प्रत्येकासाठी एक संदेशही लिहिला आहे. सध्या त्याची ही पोस्ट सगळीकडेच व्हायरल होते आहे. 


काय लिहिलंय यानं आपल्या पोस्टमध्ये? 


या कर्मचाऱ्यानं आपल्या पोस्टमध्ये (Google Employer Linkedin Post) लिहिलंय की, दोन आठवड्यातच आमच्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढून टाकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे गुगलनं खूपच मेहनती आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीतून काढून टाकले आहे. या कंपनीत मी 2005 पासून कार्यरत आहे. त्यावेळी मला त्यांनी इंटर म्हणून घेतले होते परंतु त्यानंतर मी पुर्ण वेळ या कंपनीसाठी काम करायला सुरूवात केली होती. त्यामुळे मी गेली 16 वर्षे या कंपनीसोबत काम केलं. 


या पोस्टमध्ये त्यानं कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट लिहिली आहे ज्यात तो म्हणाला, गुगलला मी धन्यवाद देतो कारण त्यांनी माझ्यासारख्या कर्मचाऱ्याला इतकी वर्षे कामावरून ठेवून घेण्याची रिस्क उचलली. गुगलनं या नोकरकपातीमुळे चांगल्या आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांना गमावले आहे. तेव्हा सध्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एकच सल्ला आहे की त्यांनी आपल्या युझर्स आणि गुगलमध्ये चांगले संबंध जोडून ठेवावेत त्याचबरोबर चांगले काम करून दाखवावे.