Viral Video: आपला जोडीदार यशस्वी व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग ती दैनंदिन आयुष्यातील लढाई असो किंवा मग एखादी मोठी स्पर्धा असो. आपला पती किंवा पत्नी याने त्या स्पर्धेत अव्वल यावं असं प्रत्येक जोडीदाराला वाटतं. पण जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा होणारी निराशाही मोठी असते. पण या निराशेवर मात करत नव्या जोमाने कष्ट करत पुन्हा यश मिळवणं अपेक्षित असतं. पण ब्राझीलमध्ये असा काही प्रकार घडला जो पाहून तुम्हालाही धक्का बसले. सौंदर्य स्पर्धेत पत्नी जिंकली नाही म्हणून पतीने थेट मंचावर जाऊन असं काही कृत्य केलं की त्याच्या पत्नीसह सगळेच चक्रावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, ब्राझीलमध्ये सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत त्याची पत्नी दुसऱ्या क्रमांकावर आल्याचं जाहीर होताच तिचा पतीने थेट मंच गाठला. इतकंच नाही तर विजेच्या उमेदवाराला दिला जाणारा मुकूट त्याने खेचून घेतला आणि मंचावरच जोराने आपटला. त्याचं हे कृत्य पाहून मंचावर उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या पत्नीलाही काही वेळ काय सुरु आहे हे कळत नव्हतं. 


Globo या आऊटलेटच्या वृत्तानुसार, ब्राझीलमध्ये शनिवारी LGBTQ+ सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान हा सगळा प्रकार घडला. प्रेक्षकांमध्ये उपस्थित एक तरुण मोबाइलमध्ये विजेत्याची घोषणा होतानाचा क्षण रेकॉर्ड करत होता. याचवेळी हा व्यक्ती मंचावर येऊन हैदोस घालण्यास सुरुवात करतो. मिस गे माटो ग्रोसो 2023 स्पर्धेत विजेत्याची घोषणा झाल्याने त्याचा भडका उडाला.



व्हिडीओत दिसत आहे, त्यानुसार विजेत्याची घोषणा होणार होती. यावेळी एक महिला स्पर्धेक Nathally Becker आणि Emannuelly Belini यांच्याजवळ मुकूट घेऊन येते. ती विजेत्या सौंदर्यवतीची घोषणा करणार असते. यावेळी उत्कंठा ताणण्यासाठी ती मुकूट आळीपाळीने दोघींच्या डोक्यावर नेत होती. यादरम्यान प्रेक्षकांचाही आवाज सुरु होता. 


यादरम्यान Emannuelly Belini हिला विजेती घोषित करत तिच्या डोक्यावर मुकूट ठेवला जाणार असतो. इतक्यात पत्नी हारल्याच्या रागात पती मंचावर धावत येतो आणि कार्यक्रमात अडथळा आणतो. 


संतापाने पेटलेला पती महिलेच्या हातून मुकूट खेचून घेतो आणि मंचावर आपटतो. यादरम्यान तो आरडाओरड करत आपल्या पत्नीचा हात धरुन तिला नेत असतो. यावेळी तो पुन्हा एकदा मुकूट उचलतो आणि खाली आपटतो. अचानक झालेला हा सगळा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसतो. 


न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, सुरक्षा कर्मचारी यावेळी त्याला अडवतात आणि स्टेजच्या मागे घेऊन जातात. सौंदर्य स्पर्धेचे समन्वयक मालोन हेनिश यांनी नंतर एक निवेदन प्रसिद्ध केले ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, "निकाल योग्य नसल्याचा त्याचा दावा होता. यामुळेच त्याने अडथळा आणत तोडफोड केली." त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.