Video : स्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि...
स्पेस वॉक सुरु असताना International Space Station वर विचित्र घटना घडली. यामुळे नासाच्या कंट्रोलरुममध्ये गोंधळ उडाला.
International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर सध्या अनेक अंतराळवीर कार्यकरत आहेत. विशिष्ट प्रयोग तसेच International Space Station च्या मेंटेनन्ससाठी अंतराळवीरांनी स्पेस वॉक केला. स्पेस वॉक करताना स्पेस स्टेशनवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
1 नोव्हेंबर रोजी स्पेसवॉक करत असताना स्पेस स्टेशनवर विचित्र घटना घडली. अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल ओ हारा यांच्यासोबत अनपेक्षित प्रकार घडलाय. हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेरील कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर काम करत होते. यावेळी यांच्या हातात असलेला टूल बॉक्स हातातून निसटला आणि तो अंतराळात गेला.
नासाच्या कंट्रोल स्टेशनमध्ये खळबळ
स्पेस स्टेशनवर स्पेसवॉक सुरु असाताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला. यानंतर या अंतराळवीरांना कमांड देणाऱ्या नासाच्या कंट्रोल स्टेशनमध्ये खळबळ उडाली. फ्लाइट कंट्रोलने स्टेशनच्या बाह्य कॅमेऱ्यांचा वापर करून टूल बॅगचे निरीक्षण केले.
स्पेस स्टेशनला धोका आहे का?
या विचित्र दुर्घटनेनंतर स्पेस स्टेशनच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, दुर्घटनेमुळे स्पेस स्टेशनला कोणताही धोका नसल्याचे नासाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या टूल बॉक्समुळे नेमके किती नुकसान झाले याचे मुल्यांकन केले जात आहे. लवकरच नासातर्फे नुसकानाचा आकडा जाहीर केला जाईल.
दुर्घटनेला जबाबदार कोण?
तब्बल सहा तास 42 मिनिटे हा स्पेस वॉक सुरु होता. या स्पेसवॉकमध्ये अंतराळवीरांनी सौर उर्जेसह स्पेस स्टेशन बाहेरील अनेक पार्टचे मेंटेनन्स केले. यावेळी कम्युनिकेशन बॉक्सवर काम करत असतानाच अंतराळवीरांच्या हातातून टूल बॉक्स अंतराळात पडला. फ्लाइट कंट्रोल कॅमेऱ्यात टूल बॉक्स अंतराळात पडातानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. काम करत असताना अंतराळवीरांच्या हातातून चुकून हा बॉक्स सुटला. या घटनेला अंतराळवीरांनाच जबाबदार धरण्यात आले आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2008 मध्येही एक टूलबॉक्स अशाच प्रकारे अंतराळात पडला होता. मात्र, अनेक महिने पृथ्वीभोवती फिरल्यानंतर 2009 मध्ये तो पृथ्वीच्या वातावरणात घुसला आणि जळून खाक झाला. तत्कालीन अहवालानुसार या टूलबॉक्सची किंमत 1 लाख डॉलर इतकी होती.
पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापन केली आहे. 20 नोव्हेबर 1998 पासून International Space Station ची उभारणी करण्यात आली. एक एक भाग अंतराळात नेऊन अंतराळात या स्पेस स्टेशनची उभारणी करण्यात आली. येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत.