Russia Moscow : जगात पुर आल्याच्या अनेक घटना घडतात.  रशियातल्या मॉस्कोमध्ये अत्यंत विचित्र आणि भयानक घटना घडली आहे. मॉलमध्ये उकळत्या पाण्याचा पूर आला. या दुर्घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 70 जण जखमी झाले आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे.


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्रेमेना गोदा शॉपिंग सेंटर परिसरात ही दुर्घटना घडली आहे. नेमही प्रमाणे लोक या शॉपिंग  मॉलमध्ये खरेदीसाठी आले होते. यावेळी अचानक गरम पाण्याचा मोठा प्रवाह मॉलमध्ये प्रवाहित झाला. हे पाणी अक्षरश: उकळत होते. या गरम पाण्यातून वाफा निघत होत्या. साधारण गुडघ्यापर्यंत हे पाणी मॉलमध्ये भरले होते.


मॉलमध्ये लोकांचा आरडाओरडा


उकळत्या पाण्याचे चटके बसून पाय भाजल्याने मॉलमध्ये लोकांचा आरडाओरडा सुरु झाला. बचावासाठी लोक सैरावैरा पळू लागले. या दुर्घटनेत उकळत्या पाण्यातून भाजल्याने एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.  सुमारे 70 जण जखमी झाले आहेत. यापैकी 50 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अचानक आलेल्या या पुरात मॉलमध्ये एकूण 18 जण अडकले होते.


मॉलच्या छतापर्यंत पाण्याच्या वाफा


या दुर्घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. रशियन वृत्तवाहिनी देखील याबाबतचे वृत्त दिले आहेय. व्हिडिओमध्ये मॉलच्या छतापर्यंत गरम पाण्याच्या वाफा दिसत आहेत.या घटनेचे वृत्त समजताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने येथे मदतकार्य राबवण्यात आले. मॉलमध्ये सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नव्हते यामुळे ही दुर्घटना घडली. या प्रकरणी मॉल मालकाविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे रशियन तपास समितीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच तातडीने मदत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 


गुजरातमध्ये पूरस्थिती


गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जूनागड आणि नवसारी भागात परिस्थिती जास्त बिकट आहे. जूनागडमध्ये नदी-नाले दुथडी भरून वाहतायेत. आणि रस्तेही जलमय झालेत. काही ठिकाणी गुरं पाण्यात वाहून गेलीयेत तर काही ठिकाणी माणसं. तर काही ठिकाणी गाड्यासुद्धा खेळण्यांप्रमाणे पुरात वाहून गेल्यात. जोरदार पावसामुळे जूनागड मध्ये परिस्थिती बिघडत चाललीये. तीन तास झालेल्या पावसाने दोलतपार, सबलपुर, राजलक्ष्मी पार्क आणि कालवा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.