चीनमध्ये एका पित्याने आपल्या प्रेसयीच्या साथीने दोन लहान मुलांची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांनी मुलांना उंच इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं होतं. यानंतर सपूर्ण देशभरात संताप व्यक्त होऊ लागला होता. दरम्यान आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना फासावर लटकवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झँग बो (Zhang Bo) आणि त्याची प्रेयसी ये चेंगचेन (Ye Chengchen) यांनी 2 नोव्हेंबर 2020 रोजी दोन वर्षांची मुलगी आणि एका वर्षाच्या मुलाला 15 व्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं होतं. यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता असं वृत्त ग्लोबल टाइम्सने दिलं आहे. 


पोलिसांनी तपास केला असता झँग आणि चेंगचेन यांनीब बाळांच्या हत्येचा कट आखला होता हे समोर आलं. स्थानिक फिर्यादींनी या दोघांविरुद्ध "हेतूपूर्वक हत्या" केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. 


सरकारी वकील कार्यालयाने केलेल्या आरोपानुसार, झँग आणि चेंगचेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती. यानंतर ते नात्यात अडकले होते. घटस्फोटित असलेल्या झांगला चेंगचेन वारंवार सांगत होती की, जर तुला मुलं असतील तर मी तुझ्यासोबत राहणार नाही.


फेब्रुवारी 2020 मध्ये दोघांनी दोन्ही चिमुरड्यांची कशापद्दतीने हत्या करण्यात येईल यासाठी कट आखण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी अनेकदा समोरासमोर तसंच चीनमधील प्रसिद्ध मेसेजिंग अॅप WeChat वरुन चर्चाही केली होती. यानंतर त्यांनी अपघाताने मृत्यू झाला आहे असं दर्शवत त्यांचा काटा काढण्याचं ठरवलं. 


खटला दाखल झाल्यानंतर जुलै 2021 मध्ये पहिली सुनावणी झाली. यावेळी मुलांची आई चेन मेलिनने कोर्टात भरपाई देण्याची तसंच पूर्वाश्रमीचा पती आणि त्याच्या प्रेयसीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. कोर्टाने 28 डिसेंबर 2021 मध्ये हेतूपूर्वक हत्या केल्याच्या आरोपाखाली झँग आणि चेंगचेन यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. यानंतर झँग आणि चेंगचेन यांनी या निर्णय आव्हान दिलं. 


गतवर्षी 6 एप्रिलला दुसऱ्यांचा खटल्या सुनावणी सुरु झाली. यावेळी झँगने आपण मुलांची हत्या केली नसल्याचं सांगत आधी दिलेला कबुली नाकारली. मुलांचा मृत्यू अपघाताने झाल्याचा दावा त्याने केल्याचं वृत्त ग्लोबल टाइम्सने दिलं. 


चीनमधील सर्वोच्च न्यायालय सुप्रीम पिपल्स कोर्टाने झँग आणि चेंगचेन यांना दोषी ठरवलं. दोघांनी हेतूपूर्वक आणि बेकायदेशीर पद्धतीने मुलांची हत्या केल्याचा निष्कर्ष कोर्टाने नोंदवला. यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावत त्याची अंमलबजावणी करण्यात आली.