डेटिंग अॅपच्या माध्यमातून 22 वर्षीय तरुणीला आपल्या आयुष्यभराचा जोडीदार मिळाला होता. त्याच्यासह लग्न करण्याची आणि नव्या आयुष्याची स्वप्नं रंगवण्यासही तिने सुरुवात केली होती. पण एक दिवस तरुणीला आपल्या प्रियकराबद्दलचं सत्य समजलं आणि तिला धक्काच बसला. स्वत: तरुणीने सोशल मीडियावर ही संपूर्ण घटना सांगितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली मेलच्या वृत्तानुसार, तरुणी ब्रिटनच्या शेफिल्ड येथील रहिवासी आहे. तरुणीचं नाव मेडेलीन आहे. काही दिवसांपूर्वी डेटिंग अॅप टिंडरवर तिची जैसेन नावाच्या एका तरुणाशी भेट झाली होती. यावेळी त्यांनी एकमेकांना भेटण्याचं ठरवलं. काही भेटीनंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. आपलं नातं पुढे नेण्यासाठी त्यांनी रोमँटिक हॉलिडेसाठी स्पेनला जाण्याचा निर्णय घेतला. 


पण हॉलिडेवर गेल्यानंतर जैसेनची पोलखोल झाली. त्याची आधीच एक प्रेयसी असून ती गर्भवती असल्याचं समोर आलं. ही गोष्ट समजल्यानंतर मेडेलीनला धक्काच बसला. 


तीन महिन्यांच्या नात्यानंतर मेडेलीन जैसनसह सुट्टी घालवण्यासाठी स्पेनमध्ये पोहोचली होती. पण ते एअरपोर्टला पोहोचताच एका महिलेने त्यांना रोखलं. तिने आपण जैसेनची प्रेयसी असून त्याच्या मुलाची आई होणार असल्याचं सांगितलं. हे सर्व ऐकल्यानंतर मेडेलीनला धक्काच बसला. तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. 


जैसेन याने नाव बदलून चार वेगवेगळ्या तरुणांना डेट केलं असल्याचंही महिलेने यावेळी सांगितलं. जैसेन तरुणींची फसवणूक करत असून त्याला दोन मुलंही असल्याचं महिलेने सांगताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर विमानतळावर काही वेळासाठी वातावरण चांगलंच तापलं होतं. 


जैसेन याचा खरा चेहरा उघड झाल्यानंतर मेडेलीनने डेटिंग अॅपपासून फारकत घेतली आहे. ज्याला आपण आयुष्यभराचा जोडीदार बनवण्याचं स्वप्न पाहत होतो, त्याने फसवणूक केल्याने तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. मेडेलीन म्हणते की, "टिंडरवर माझा पहिला अनुभव होता. मला वाटतं आता मी कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू शकणार नाही. जैसेन माझ्या भावनांशी खेळला असून माझा फायदा उचलला आहे. त्याने माझी फसवणूक केली आहे'.