Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. याचं कारण म्हणजे यामध्ये एक व्यक्ती 19 व्या मजल्यावरुन खाली पडूनही जिवंत राहिला आहे. इतकंच नाही तर खाली पडल्यानतंर तो स्वत:च्या पायावर उभा राहून रुग्णालयात गेला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादी व्यक्ती उंच इमारतीवरुन खाली पडली तर ती जिवंत राहणं अशक्य असतं. त्यातही जर ती वाचली तर हात किंवा पाय फ्रॅक्चर झाले असल्याने तो पुन्हा उभं राहणं कठीण असतं. त्यामुळेच व्हायरल झालेल्या व्हिडीओत जेव्हा एक व्यक्ती 19 व्या माळ्यावरुन खाली पडूनही व्यवस्थित उभा राहतो तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. 


ही व्यक्ती मद्यावस्थेत असताना 19 व्या मजल्यावरुन खाली कोसळली. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, एका कारवर येऊन तो पडतो. इतक्या उंचीवरुन खाली पडल्याने कारचा अक्षरश: चुराडा होतो. विशेष बाब म्हणजे, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचतात तेव्हा तो व्यवस्थिपणे कारवर उभा राहतो. यानंतर जेव्हा त्याला रुग्णालयात नेलं जात होतं, तेव्हाही तो स्वत:च्या पायावर उभा राहिला. 



इतक्या भीषण दुर्घटनेनंतरही चमत्कारिकपणे वाचल्यानंतर जेव्हा त्याला रुग्णालयात नेलं जात होतं, तेव्हा तो चक्क गाणं गात होता. या दुर्घटनेचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंवर अनेकजण कमेंट करत आहेत. हा माणूस आहे की सुपरमॅन अशी विचारणा लोक करत आहेत. 


घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने सांगितलं की, "इतक्या उंचावरुन खाली पडल्यानंतरही तो काहीच न झाल्याप्रमाणे फिरत होता हा एक चमत्कारच होता. तो गाणंही गात होता". रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी पूर्ण रस्ताभर तो गाणं गात होता असं सांगितलं आहे. 



स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय आर्थर याचा तोल गेल्याने तो खाली पडला. मद्यावस्थेत आपण अशा इमारतीत गेलो होतो, जिथे आपलं घरच नाही असं त्याने सांगितलं आहे. ब्रेकअपनंतर मानसिक स्थिती योग्य नसून त्यातून सावरण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं आहे.