First Time Deaf Girl Hear Sound: जीवनातील प्रत्येक क्षण मोलाच असतो. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगणं महत्त्वाचं आहे. पण क्षण सुखाचा असेल असं नाही तर काही दु:खाचे देखील असतात. अशावेळी दु:खावर मात करून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. काही जणांना जन्मत:च दिव्यांगत्व असतं. त्यामुळे आयुष्यभर अशा दु:खात जगणं भाग असतं. विचार करा आपल्याला लहानपणापासून ऐकू येत नसेल तर आपलं जीवन कसं असेल. कदाचित आपण याबाबतची कल्पना देखील करू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका लहानगीला जन्मापासूनच ऐकू (Deaf Girl Hear) येत नव्हतं. पण विज्ञानाने तिला अनोखी भेट दिली आणि तिला आवाज ऐकू आला. पहिला स्वर कानावर पडताच मुलीच्या डोळ्यातून अश्रू घरंगळू लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ एका युजर्सने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मुलीचं नाव नेस्ताया असून केनियात राहणारी आहे. या मुलीचं वय सात वर्षे असून तिला लहानपणापासून ऐकू येत नव्हतं. यासाठी तिच्या कानाची सर्जरी कित्येकदा करण्यात आली. पण इतकं करूनही तिला ऐकू येत नव्हतं. लहानपणी ती आजारी पडली होती तेव्हा तिच्या कानचा पडदा फाडला होतं, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. पण मुलीनं आणि कुटुंबियांनी हार मानली नाही आणि कानाची मशिन लावली. मशिन लावल्यानंतर तिला कसं वाटलं त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात आला आहे. पहिल्यांदा काही शब्द ऐकल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.



व्हिडीओत नेस्ताया एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. डॉक्टरांनी तिच्या कानात मशिन लावलं आणि टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवताच नेस्तायानं मागे वळून पाहिलं. त्यानंतर आसपास बोलत असल्याचं आवाज ऐकला तेव्हा तिला आनंद झाला आणि भावुक होऊ रडून लागली. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी सोशल मीडियावर पाहिला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.