Internet Apocalypse Solar Storm: अंतराळात सध्या लक्षणीय घाडमोडी घडत आहे. पृथ्वीवासियांसाठी एक धोक्याची सूचना मिळत आहे. एक सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावत आहे. दिवसेंदिवस या वादळाची तीव्रता वाढत आहे. 2025 मध्ये या सौर वादळाचा पृथ्वीवर  भडका उडणार आहे. या सौरवादळामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला कोणताही धोका नसला तरी उपग्रहांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या वादळामुळे संपूर्ण जगातील इंटरनेट कनेक्शनचा सर्वनाश होणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर याला Internet Apocalypse असे संबोधले जात आहे. 


25 वेळा आले सौरवादळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1755 पासून या सौर वादळांची नोद केली जात आहे. तेव्हापासून आा पर्यंत 25 वेळा अशा प्रकारच्या सौर वादळांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, दिवसेंदिवस हे सौरवादळ अधिक वेगवान झाले आहे. अंदाजापेक्षा जास्त सनस्पॉट्स आणि उद्रेक होताना दिसत आहेत.  US National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) च्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार सौर वादळे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स आहेत. यामुळे पृथ्वीवर विनाशकारी परिणाम होवू शकतात. सौर वादळाबाबत अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी देखील धोक्याचा इशारा दिला आहे. 


2025 मध्ये वादळाची तीव्रता वाढणार


सध्या मोठ्या प्रमामात सौर वादळं निर्माण होत आहेत. सौर वाऱ्याचा वेगवान प्रवाह पृथ्वीच्या जवळ येत आहे. यामुळे चिंता वाढली आहे.सन 2025 या वर्षात वादळाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.  सौर वादळामुळे  पृथ्वीच्या अनेक भागात विजा कोसळू शकतात. पॉवर ग्रीडचं नुकसान होऊन बत्ती गुल होऊ शकते. शिवाय मोबाईल फोन बंद पडू शकतात. जीपीएस सिस्टीमवरही परिणाम होऊ शकतो. अनेक उपग्रहांनाही झळ बसू शकते. याचा परिणाम इंटेरनेटट सेवेवर पडू शकतो. उपग्रहांचे नुकसान झाल्यास इंटरनेट कनेक्शनचा सर्वनाश होवू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. 


सौर वादळ म्हणजे काय आणि ते कसे तयार होते?


सूर्याच्या पृष्ठभागावर असलेल्या सनस्पॉट्स म्हणजे चमकणाऱ्या ठिपक्यांमधून चुंबकीय उर्जा उत्सर्जित होत असते. त्यांचा सूर्याभोवतालच्या वातावरणात झालेला स्फोट म्हणजेच सौर वादळ. हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारा एक प्रकारचा किरणोत्सर्ग आहे, त्यामुळे उष्णता वाढते. ज्याला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 15 ते 18 तास लागतात.या  वादळामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या ज्वाळा तयार होतात. यातून मोठा किरणोत्सर्गार होतो.