मुंबई : सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, ज्याच्या मदतीने आपण अनेक गोष्टी करु शकतो. सोशल मीडिया (Social Media) हे एकमेव माध्यम आहे, ज्यामुळे आपण आपल्या भावनांना एक नवीन मार्ग देवू शकतो. कोणत्याही मुद्द्यावर आपण आपलं मत सोशल मीडियावर मांडू शकतो. रोज इंटरनेटवर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी शिकवतात, तर काही व्हिडीओ मनोरंजनासाठी असतात. आता देखील एका महिला अँकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हायरल व्हिडीओ एका वृत्तवाहिनीशी संबंधित आहे. जिथे अँकर बातम्या वाचताना (Live News Bulletin) दिसत आहे आणि याच दरम्यान हवेत उडणारी एक माशी तिच्या तोंडात शिरते आणि अँकर ती माशी गिळते.  हा व्हिडीओ कॅनडामध्ये राहणाऱ्या एका महिला अँकरचा असून तिने स्वत: या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.


व्हिडीओमध्ये महिला अँकर पाकिस्तानमधील पुराशी संबंधित बातम्या वाचत आहे. इतक्यात एक माशी तिच्या तोंडात येऊन गिळते. बुलेटिनमध्ये बाधा नको म्हणून माशी गिळते जेणेकरून रिपोर्टिंगमध्ये अडथळा येऊ नये.



फराह नसीर (Farah Nasser) असे या महिला अँकरचं नाव असून ती कॅनडाच्या ग्लोबल न्यूज चॅनलची अँकर आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये, 'हसणं फार महत्त्वाचं आहे आणि हसायला हवं...' अलं लिहिलं आहे. 


आतापर्यंत महिला अँकरच्या व्हिडीओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेक लोकांनी याला लाईक केलं आहे. यूजर्स व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्सही करत आहेत.