Parasite In Eye: एक जिवंत किडा तब्बल दोन वर्ष एका महिलेच्या डोळ्यातून रक्त शोषत होता.  आफ्रिकेतील काँगो येथील एक महिलेसह हा धक्कादायक प्रकार घडला. या महिलेची वैद्यकिय तपासणी केल्यावर डॉक्टरही हैराण झाले. कारण या महिलेने ज्या प्राण्याचे मांस खाल्ले त्यातूनच हा किडा महिलेच्या डोळ्यात गेला. या महिलेची केस स्टडी जामा ऑप्थाल्मोलॉजी नावाच्या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाइव्ह सायन्सने देखील या संदर्भातील एक लेख प्रसिद्ध केला आहे. या महिलेला मगरीचे मांस खाल्ल्याने संसर्ग झाला. मगरीमुळे माणसाला संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना आहे. या विचित्र प्रकारामुळे डॉक्टर देखील हैराण झाले.  28 वर्षीय महिलेला विचित्र प्रकारचा संसर्ग झाला होता. या महिलेच्या डोळ्याजवळ गाठ तयार झाली होती. ही गाठ दुखत नव्हती. किंवा याचा या महिलेला त्रास होत नव्हता. मात्र, आरशात पाहताना ही मोठी गाठ महिलेला स्पष्टपणे दिसायची. ही गाठ म्हणजे एक प्रकारचा संसर्ग आहे. वैद्यकिय भाषेत अशा प्रकारच्या संसर्गाला ऑक्युलर पेंटास्टोमियासिस असे म्हणते. 'पेंटास्टोमिड्स' नावाच्या परजीवीमुळे डोळ्यांचा हा दुर्मिळ संसर्ग होतो.


रक्त शोषणारा जिवंत किंडा


'पेंटास्टोमिड्स' नावाचही ही परजीवी एक प्रकारचा जिवंत किडा आहे.  या महिलेच्या डाव्या डोळ्याच्या नेत्रश्लेष्मला खाली  'पेंटास्टोमिड्स' संसर्ग झाला. हा किडा महिलेचे  रक्त शोषत होता. रक्त शोषून हा किडा 10 मिमीने वाढला. यामुळे डोळ्याजवळ एका मोठ्या गुठळी प्रमाणे हा किडा दिसत होता. 


मानवाच्या शरीरात अशा प्रकारे प्रवेश करतात हे किडे


 'पेंटास्टोमिड्स' नावाच्या परजीवीचे सखोल संशोधन करण्यात आले. ही परजीवी आर्मिलिफर ग्रँडिस प्रजातीचा आहे. साप आणि अजगर यांच्या श्वसनमार्गामध्ये या परजीवी अंडी घालतात. ही अंडी नंतर फुफ्फुसातून बाहेर पडतात. सापाच्या तोंडातून किंवा पचनसंस्थेद्वारे या परजीवीची अंडी बाहरे पडतात. यानंतर साप जेव्हा उंदीर यांना आपले भक्ष्य बनवतात. त्यावेळेस ही अंडी त्याच्या श्वसनसंस्थेत पोहोचतात. अशा प्रकारे परजीवीचे हे जीवनचक्र पूर्ण होते. या परजीवी संक्रमित अन्न किंवा पाण्याद्वारे मानवाच्या शरीरात पोहचतात. यामुळे सापांच्या जवळ राहिल्याने या परजीवीच्या संसर्गाचा धोका अध्क असतो. अनेकदा कच्च्या सापाचे मांस खाल्ल्यानेही संसर्ग होतो. काँगो येथील महिले सापाचे मांस खाल्ले नव्हते. या महिलेने मगरीचे मांस खाल्ले होते. यामुळेच महिलेला या परजीवीचा संप्रग झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.  मगरीचे मांस खाणाऱ्या लोकांमध्ये आर्मिलिफर डोळ्यांचा संसर्ग यापूर्वी कधीही दिसला नाही. अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याने डॉक्टर देखील हैराण झाले आहेत.


परजीवीच्या संसर्गामुळे मानवाच्या शरीरावर काय परिणाम होतो?


अनेकदा  परजीवीचा संसर्ग लगेच दिसून येत नाही. मात्र, या परजीवी मानवाच्या शरीरात खोलवर मारा करतात. मानवाचे अवयव पोखरुन त्यांना कमजोर करतात. यामुळे थेट जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.