नवी दिल्ली : कजाकिस्तानमध्ये एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती जिराफ उभा असलेली जाळी पार करत जिराफवर बसत प्राणीसंग्राहलयाच्या आत जातो. ही घटना shymkent zoo येथील असल्याचं समजतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिराफच्या पाठीवर बसणारा हा व्यक्ती नशेत असल्याचं दिसतंय. तो व्यक्ती जिराफाच्या पाठीवर बसण्यात यशस्वी होतो, पण काही पावलांवर जिराफ त्याला खाली पाडतो. काही लोक त्याला थांबवण्याचाही प्रयत्न करतात.



हा व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी तुर्केस्तान टुडे नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. प्राणीसंग्रहालयात अशाप्रकारे अनधिकृतरित्या घुसणाऱ्या यक्तीचा शोध सुरु आहे. त्याचा शोध लागल्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.