मुंबई : स्मशान म्हटलं कीच अनेकांच्या छातीत धडकी भरते. मग जरा कल्पना करा जर तुम्ही स्मशानाच्या बाजूने जात असाल आणि तुम्हाला स्मशानात एक महिला पांढऱ्या कपड्यांमध्ये हातात सांगांड्यासोबत डान्स करताना दिसली तर? अशीवेळी काय परिस्थिती असेल तुमची? मात्र असंच काहीच चित्र एका स्मशानात पहायला मिळालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यॉर्कशायर, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या लोकांसोबत घडलं. स्मशानासमोरून जाणाऱ्या लोकांना या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला. काहींना घाम सुटला तर काही जण तिथून शांतपणे निघून गेले.


डेली मेलच्या अहवालानुसार, यॉर्कशायरमधील हल जनरल स्मशानभूमीचे काही फोटोस व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक महिला हातात सांगाडा घेऊन डान्स करताना दिसतेय. 


दफनभूमी शेजारून जाणाऱ्या लोकांनी सांगितलं की, ती महिला काही वेळ सांगाड्यासह डान्स करत राहिली. नंतर ते सांगाडे तिचं मूल असल्यासारखे तिला जपण्यास सुरुवात केली. फोटोमधील महिलेच्या शेजारी आणखी एक सांगाडा दिसतो. हा सांगाडा एखाद्या कुत्र्याचा असल्याचं दिसतंय. 


'हल जनरल' नावाच्या कब्रस्तानात ही महिला ननच्या ड्रेसमध्ये दिसली. फोटोंमध्ये तिच्या हातात एक सांगाडा आहे. स्थानिक लोकांचं म्हणणे आहे की, या महिलेला केवळ एकाच नव्हे तर स्मशानभूमीच्या सर्व सांगाड्यांसह पाहिलं गेलंय. ती अनेकदा स्मशानभूमी जाते आणि अशा विचित्र गोष्टी करू लागते. कोणीही या महिलेला रोखण्याची किंवा तिला प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाही. 


अलीकडेच, जेव्हा ती स्त्री पुन्हा स्मशानभूमीत दिसली, तेव्हा तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ही विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद केली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये महिलेच्या हातात मानवी सांगाडा स्पष्टपणे दिसतोय. या स्त्रिबद्दलच्या विविध गोष्टी समोर आहेत, परंतु सत्य उघड झालेलं नाही.


1847 मध्ये बांधलेलं हे स्मशान 1972 मध्ये बंद करण्यात आलं. 1800च्या दरम्यान कॉलराच्या साथीमुळे मरण पावलेल्या लोकांचे बहुतेक मृतदेह या ठिकाणी पुरले गेले. या स्मशानभूमीचा वापर जवळजवळ 50 वर्षांपासून केला जात नाही, तरीही ती महिला तिथे जाताना दिसते.