एकदा लग्न झालं की, मग नातेवाईक आणि कुटुंबाकडून मूल कधी होणार हा तगादा लावला जातो. मूल जन्माला घालणं हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न असतानाही हमखास त्यावर सल्ले दिले जात असतात. यामध्ये अनेकदा आई-वडिलही असतात. अनेक दांपत्यं आर्थिक स्थैर्य, मानसिक स्थिती या कारणांमुळे मुलांचा निर्णय लांबणीवर टाकतात. पण आपली पिढी वाढत राहिली पाहिजे या विचारसरणीला हे मान्य नसतं. दरम्यान अशीच एक घटना समोर आली ज्यामध्ये मुलीने आई होण्यास नकार दिला असता महिलेने अजब निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिलेची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने आपली मुलगी मूल जन्माला घालण्यास नकार देत असल्याने स्वार्थी म्हटलं आहे. जर आपल्या मुलीने मूल जन्माला घातलं नाही तर पिढी पुढे सुरु ठेवण्यासाठी आपल्यालाच मुलं जन्माला घालावी लागतील असं या महिलेने म्हटलं आहे. या महिलेचं वय 42 वर्ष आहे. 


पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?


महिलेने पोस्टमध्ये लिहिलं आहे की "मी 1970 च्या दशकातील आहे. 1990 च्या दशकात जन्मलेल्या मुलांबद्दल माझी तक्रार आहे. माझ्या 22 वर्षीय मुलीने कधीही आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी ती नसबंदी करणार आहे. पण अजूनही त्या आत्मांना जन्म घ्यायचा आहे ज्यांना पूर्वजांच्या कर्मांमुळे आमच्या कुटुंबात येण्याची गरज आहे. पण मुलीने आई न होण्याचा निर्णय घेतला असल्याने मला दोन मुलं जन्माला घालून त्यांचा सांभाळ करावा लागणार आहे".


महिलेवर नेटकऱ्यांची टीका


महिलेच्या पोस्टवर नेटकरी टीका करत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की "1970 च्या दशकातील असल्याने प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरणं चुकीचं आहे".


दरम्यान या प्रकरणामुळे पुन्हा विवाहित दांपत्यांकडून मूल जन्माला न घालण्याच्या नव्या ट्रेंडची चर्चा सुरु झाली आहे. करिअर, वाढती महागाई आणि पर्यावरणाशी संबंधित समस्यांमुळे अनेक तरुण मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतात. याशिवाय अनेक तरुण कायमच अविवाहित राहण्याचाही निर्णय घेताना दिसत आहेत.