शरिरावर 72 पिअरसिंग, डोळ्यात टॅटू, जीभेचे दोन भाग अन्...; मांजरीसारखं दिसण्याच्या हौसेपोटी तरुणीने काय केलं पाहा
आपली मांजरीसारखं दिसण्याची इच्छा असून, त्यासाठी शरिरात अनेक बदल केल्याचं या तरुणीने सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने आपली जीभही दोन भागात कापली आहे. याशिवाय कपाळावर शिंगंही बसवली आहेत.
इटलीमधील रोम येथे राहणाऱ्या एका तरुणीने आपल्या शरिरात इतके बदल केले आहेत की, ती आता मुलगी कमी आणि मांजर जास्त दिसत आहे. तिने आपल्या शरिरात तब्बल 20 बदल केले आहेत. या तरुणीचं नाव कियारा डेल एबेट आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, तिचीच आपण मांजरीसारखं दिसावं अशी इच्छा होती. यामुळे ती सतत आपल्या शरिरात बदल करत होती. तिने टिकटॉकवर आपले व्हिडीओही पोस्ट केले आहेत. करोडो लोकांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. पण यावरुन ती अनेकदा ट्रोलही होत असते.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, कियाराचं म्हणणं आहे की ती आपल्या घरात एकदम व्यवस्थित आहे. तसंच आपल्या या लाइफस्टाइलचाही तिला काही त्रास नाही. 22 वर्षीय कियाराचं म्हणणं आहे की, मी एकदम चांगली कॅट लेडी आहे. तिने वयाच्या 11 व्या वर्षीच शरिरात बदल करण्यास सुरुवात केली होती. यावेळी तिने पियरसिंग आणि इअर स्ट्रेचिंग केलं होतं.
यानंतर 5 वर्षात तिने शरिरावर तब्बल 72 पिअरसिंग केल्या आहेत. इतकंच नाही तर कियाराने आपल्या जीभेचे दोन भाग करुन घेतले आहेत. याशिवाय डोक्यावर दोन शिंगही लावून घेतली आहेत. आपल्या कपाळासह, नाकावरही तिने पिअरसिंग केलं आहे. टिकटॉकवरील तिच्या एका व्हिडीओला 65 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. यामध्ये ती आपली जीभ दाखवताना दिसत आहे.
कियाराने आपल्या पापण्यांखाली जास्त फॅट म्हणजेच त्वचा दिसावी यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. तिने आपल्या डोळ्यातही दोन टॅटू बनवले आहेत. आपण एक मानवी मांजर दिसावं अशी तिची इच्छा आहे.
"मानवी शरीर किती बदल शकतं आणि शारिरीक बदल करत काय मिळवू शकतं हे पाहणं वेडेपणा आहे," असं तिचं म्हणणं आहे. मी कॅट लेडी होणं जास्त योग्य आहे, कारण मला एखाद्या कार्टूनप्रमाणे दिसण्याची इच्छा नाही असंही तिने सांगितलं आहे.
मला नेहमीच मांजरी आवडल्या आहेत. शारिरीक बदल करत मी एक कॅट लेडी बनू शकते असं मला नेहमीच वाटत होतं. पण अजून मांजरीसारखं दिसायचं असेल तर मला कँथोप्लास्टी करण्याची गरज आहे. बदामासारखे डोळे मिळवण्यासाठी सर्जरी तसंच दातांना आकार द्यावा लागणार आहे. वरील ओठही कापावे लागणार आहेत असं तिने सांगितलं आहे.