इस्लामाबाद : भारतीय वायूदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान या दोघांचं नाव पाकिस्तानाच्या गुगल टॉप १० सर्चमध्ये सामील झालं आहे. २०१९ या वर्षांत पाकिस्तानात गुगलवर मोस्ट सर्च पर्सनॅलिटीच्या यादीत या दोघांच्या नावाचा समावेश आहे. सर्च इंजिनकडून याचा खुलासा करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, पाकिस्तानमध्ये टेलिव्हिजन रिऍलिटी शो बिग बॉस सीजन - १३ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत ट्रेंडिंग शो ठरला आहे. तर, टेलिव्हिजन शो मोटू-पतलू  गुगलच्या ट्रेंडिंग सर्च २०१९ मध्ये आठव्या क्रमांकावर आहे.


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान पाकिस्तानच्या गुगल सर्वाधिक सर्च लिस्टमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या गुगल सर्च लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहेत.


काही वर्षांपूर्वी भारताचं नागरिकत्व मिळालेला पाकिस्तानी गायक अदनाम सामीही इंटरनेटवर most search people मध्ये वरच्या क्रमांकावर आहे.


पाकिस्तानमध्ये मोस्ट सर्च यादीमध्ये यावर्षी बॉलिवूडचा 'कबीर सिंग' चित्रपट पाचव्या आणि 'गली बॉय' चित्रपट दहाव्या क्रमांकावर आहे.