Accident on Railway Crossing Viral Video: सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Trending Video) होताना दिसत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना अनेकजण मोबाईलचा वापर करताना दिसतात. त्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार समोर आलाय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय, ज्यामध्ये एक विदेशी महिला दिसत आहे. जी रेल्वे क्रॉसिंग (Accident on Railway) ओलांडताना हेडफोन लावून गाणी ऐकण्यात मग्न दिसत आहे. यादरम्यान रेल्वे रुळावर समोरून येणारी स्पीड ट्रेन येते. रेल्वेचा आवाजही तरुणीला ऐकू येत नाही. त्यामुळे भरधाव येणारी ट्रेन महिलेला धडकते.


आणखी वाचा - बंदूक हातात घेऊन शायनिंग मारणं नडलं, ट्रिगर दाबला गेला आणि...


शेवटच्या क्षणी ट्रेन पाहून ती महिला दूर जाण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी वेग जास्त असल्याने महिलेला ट्रेनची धडक बसते. त्यामुळे महिला ट्रेनमधून खाली पडताना दिसत आहे. 10 फूट लांब जाऊन महिला पडते. नशिबानं साथ दिल्यानं महिलेचा जीव वाचला आहे (Shocking Video of Accident in Railway Crossing). 


पाहा व्हिडीओ- 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by TRT Haber (@trthaber)


दरम्यान, देव तारी त्याला कोण मारी!, हा वाक्यप्रचार या घटनेला पुरेपुर सुट होतोय, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ टीआरथाबर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नये, असा सल्ला नेटकरी देताना दिसत आहे.